कोण भोंगळा,कोण वंगळा,
कुणी कुणाला हिन लेखे,
माळेमध्ये एकशे आठ मनी,
एकशे नववा कुठं बसे….!!!
गोड कडुनिंब,रेशमी बाभळी,
आम्रवृक्षाला कोण पुसे,
अनैतीक मितही नैतीक बनती,
डोळ्यापुढे जेंव्हा सत्ता दिसे….!!!
विचारधारा, विवेक विवेक,
राततुनं तं,बापय नं दिसे,
विवेक,विचार,विकास,प्रकाश
सत्तेपुढे ते उणे असे..!!!
आधी धर्म मग जाती पाती,
पाहुणे राव्हुणेबी ईथे चालती,
विवेक लपतोय निबीडं अंधारी
लबाडं ढोंगी थयथय करती…!!!
सत्तासुंदरी बनली बंदरी ,
मदारीचं मदारी,चोहिकडे,
छाताडावरं पाय ठेऊनी,
थयथय नाचतं,खेळ चले…!!!
उठ गड्या तु जाग झोपेतुनी
फेक झुगारूनी पाश गुलामी
समता,बंधुता,विवेक,जागवूनं,
नव्या युगाला दे सलामी……!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply