नवीन लेखन...

समाधान

मध्यंतरी सहपरिवार एका आईस्क्रीम पार्लर मध्ये गेलो होतो. मी जिथे बसलो होतो तिथून संपूर्ण आईस्क्रीम पार्लर माझ्या नजरेच्या टप्प्यात होतं. आजूबाजूच्या टेबल खुर्च्या, समोरंच असणारं लांब counter ज्याच्या त्या बाजूला order प्रमाणे आईस्क्रीम बनवून देणारी मुलं आणि या बाजूला तयार आईस्क्रीम टेबलांपर्यंत पोचवणारे आईस्क्रीम दूत आणि त्या counter च्या शेवटी cash counter वर बसलेल्या मालक काकू.( मालकीण बाई असं म्हणणं थोडं अप्रशस्त वाटतं म्हणून मालक काकू).

तशी वर्दळ तर चालूच होती. इतक्यात एक जोडपं आलं आणि आमच्या बाजूच्या टेबलावर येऊन बसलं. ते जोडपं आत शिरल्या शिरल्या त्या आईस्क्रीम बनवणाऱ्या मुलांपैकी एकानी मालक काकुना हळूच काहीतरी सांगितलं. तोपर्यंत आमची देखील order आली आणि आम्ही आईस्क्रीमचा आस्वाद घेऊ लागलो. काही मिनिटानंतर ते जोडपं निघालं आणि मग ते दोघं, तो मुलगा आणि मालक काकू यांचा संवाद कानावर येऊ लागला.. “अरे घे न रे पैसे… तो नाही म्हणतोय न मग मी नाही घेणार… अगं ताई मला लग्नाला यायला जमलं नव्हत ग.. सिझन आहे सध्या.. अरे नाहीरे असं काही नाही!!”….. असा साधारण एखादं दोन मिनिट संवाद झाल्यावर जोडपं पैसे न देता हसत हसत निघून गेलं आणि मग सगळ्याचा अंदाज आला.

या मुलाची ती कुठलीशी बहिण…लांबची देखील असेल…ज्यांचं आत्ताच लग्न झालं होतं… कदाचित मुंबईपासून लांब कुठेतरी, या मुलाला कामामुळे जाता आलं नव्हतं.. अनायसे ते दोघे आईस्क्रीम खायला आल्याचं बघताच त्या बहिणीच्या या भावानी त्याचं किती बिल होणार हे माहिती नसताना देखील “त्यांच्याकडून पैसे घेऊ नका ते मी भरीन” असं लागलीच मालक काकुना सांगितलं आणि त्यांनी देखील ते लगेच ऐकलं…..आपल्या कडून तीच लग्नाची भेट त्याला द्यायची होती. आता ते पैसे तो भरेल किंवा त्याच्या पगारातून कमी होतील किंवा मालक घेणार देखील नाहीत कदाचित…….. पण हे सगळे मुद्दे आता गौण ठरले होते………..मी बघत होतो तो फक्त त्या मुलाचा “चेहरा”……..मग मी सहज आईस्क्रीम पार्लर मधल्या आमच्या सकट इतर काही टेबलांवर नजर फिरवली. कुठे मित्रांच्या गप्पा, कुठे लहान मुलांचे गोंगाट, काही परिवार, वयस्कर व्यक्ती, कुणी सेल्फी काढतायत कुणी आईस्क्रीम चे फोटो काढतायत आणि बरंच काही… आणि हा सगळा आनंद, आस्वाद घेऊन, भलीमोठी बिलं भरून अतिशय तृप्त पणे बाहेर पडणाऱ्या त्या सगळ्या “मुखवट्या” मध्ये कैक पटींनी अधिक जास्त “समाधान” दिसत असणारा एकमेव “चेहरा” मला दिसत होता…तो त्या मुलाचा.

वास्तविक पाहता हा एक अतिशय साधा आणि फारच छोटा प्रसंग…बहुधा इतर कोणाच्या यातलं काही लक्षात देखील आलं नसेल इतका छोटा…..पण काही गोष्टी शब्दात मांडणं देखील कठीण असतं तसे मी पाहिलेले त्याच्या चेहऱ्यावरचे भाव……..तो मुलगा आता त्याच्या पुढच्या कामाला सुद्धा लागला होता….. पण त्या आगंतुक आलेल्या बहिणीला समोर असलेल्या परिस्थितीत आपल्या परीने शक्य ती लग्नाची भेट दिल्याचं खरं खुरं समाधान अजूनही त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं…. मीही इतरांसारखाच बिल देत तृप्तपणाचा मुखवटा घालून बाहेर पडलो… पण आज समाजाच्या सर्वच स्तरात दुरावत चाललेली नाती, तुटत चाललेले नात्यांचे बंध अजूनही टिकून असल्याचं “समाधान” मात्र मला नक्कीच मिळालं होतं……………..

© क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..