होऊन गेले नकळत सारे,
सुचले मला काहीच नाही,
होकार फक्त मनाचा,
मेंदूला त्याची कल्पना नाही…
समाज ठेवतो सतत नावं,
करतो त्याची कुजबूज…!
असते ती फक्त छोटीशी चूक,
वारंवार बसतो चर्चेचा त्याला मारा,
करतो एक,भोगतो एक,
मात्र मज्जा बगतो समाज सारा…
अहो, खरं कोन? समाज की मी?
या प्रश्नाचं उत्तर मात्र दडून बसतं
ज्याला जसे पाहायचे तो तसाच बघतो,
जो सरळ तो वाकडा,
अन् वाकडा तो सरळ दिसतो,
माझ्या आरशात मी एकटीच दिसते,
समाज मात्र सतत डोकावत असतो.
– श्र्वेता संकपाळ.