समजले मला प्रेम हळू हळू लोपले आहे”
सखया,भाव भावनेतील
शृंगार आता मंद पडला आहे,
समजले मला प्रेम हळू हळू लोपले आहे,
माझ्या पर्यंत तुझी भावना पोहचत आहे,
मंद पावलांनी
तुझ्या माझ्या मधील
समन्वय पुलावर,
आज ही बाग फुलांनी डवरलेली आहे
का ते फुल अद्याप तू माझ्या वेणीत माळले नाही,
हवेत किती झटकला सरळ मनाचा चिंब रुमाल
कधी डुंबत,कधी तरंगणारा
कधी दम घोटणारा,
प्रेमा पेक्षा महत्वाचे आहेत
प्रश्न या जगण्याचे,
प्रत्येक आनंद क्षणाचे
समान मूल्य अदा करावे लागते,
कसे सांगू तुला
अति परीचयात अवज्ञा होत आहे
हे सत्य स्वीकारते मी आता,
या महानगरात बाग वेली
आता खुंटत आहेत
चार कुंडीत हे दुःख मी रुजवत आहे,
राधे, तो कृष्ण आता पहिला राहिला नाही
तुझ्या नयनात तो कैद होणार नाही,
माणिनी, जगाच्या हितार्थ
जो सर्वस्व बहाल करतो
त्याला पदरात घेतल्यावर
आता कसला प्रतिवाद?
वेणू, तू कटी मेखलेत बंद हो
आता युद्ध तुतारीचा पंचम नाद घुमू लागला आहे.
******
मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘
कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया
मराठी अनुवाद- विजय नगरकर
+91 9657774990
vpnagarkar@gmail.com
Leave a Reply