नवीन लेखन...

सामाजिक बांधिलकी जपणारी – “फ्रीमेसनरी”

“जगात अनेक सामाजिक संस्था अशाही आहेत ज्या कित्येक वर्षापासून कोणताही अपेक्षेशिवाय व कार्याचा बोलबाला न करता केवळ मानवतेच्या हितासाठी तसंच तळागाळातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटीबध्द आहेत. “फ्रीमेसनरी” ही ५०० वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये स्थापन झालेली आणि भारतात २५० वर्षापासून कार्यरत असलेली सर्वधर्मसमभाव मानणारी आणि समाजहितासाठी तत्पर असणारी संस्था. या संस्थेच्या कामाचं स्वरुप, उद्दिष्टांविषयी माहिती करुन देण्यासाठी नुकतंच मुंबईतल्या फोर्ट येथील “फ्रीमेसन हॉल” येथे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने भारतात ”फ्रीमेसनरी” चं समाजकार्य कशाप्रकारे सुरु आहे त्याचा हा वेध.”

गेल्या पाच शतकापासून समाज घडवण्याच्या कामात एका कुशल गवंड्याप्रमाणे योगदान देणार्‍या “फ्रीमेसन” संस्थेचा पाया विश्वविधात्याचे पालकत्व आणि बंधुभाव या तत्त्वावर आधारीत आहे. सर्वधर्मसमभाव चा संदेश सत्य, एकमेकांना पाठबळ देणे अशी काही प्रमुख तत्वं “फ्रीमेसन मानते.

“फ्रीमेसन” च्या सदस्यांना प्राचीन धारणांचे अनुसरण आणि रुपकात्मक मार्गदर्शक रितीचा वापर करण्याची शिकवण दिली जाते, जेणेकरुन चांगली व्यक्ती ही अधिक उत्तम व्यक्ती बनून जगण्यासाठी उत्तम ठिकाण हे विश्व बनावे, ही धारणा आहे.

“फ्रीमेसन” १७२८ मध्ये भारतात आली ती पहिल्यांदा “कोलकाता” येथे. कारण “ईस्ट इंडिया कंपनी” चे मुख्य कार्यालय व सर्व व्यवहार येथूनच होत असत. आणि कालांतराने तिचा प्रचार व प्रसार वाढतच गेला. मुंबईत “फ्रीमेसनरी” चा प्रारंभ ३१ जुलै १९४० रोजी झाला. याचे कार्यालय दामोदरदास सुखदवाला मार्ग फोर्टला स्थित आहे. आजघडीला मुंबईत या संस्थेची २८ लॉज असून ७०० पेक्षा अधिक सदस्य आहेत. तसेच पुणे, पाचगणी, नागपूर या शहरात देखील या संस्थेची सेंटर्स असून भारतात लहान-मोठ्या शहरात मिळून तब्बल १३५ सेंटर्स आहेत. म्हणजे श्रीनगर पासून कन्याकुमारी पर्यत “फ्रीमेसनरी” आपली ध्येय साध्य करण्यास कटीबद्ध आहे.

“फ्रीमेसन” संस्थेची ओळख व त्याची व्याप्ती विशद करताना भारतातील या संस्थेचे पश्चिम विभाग प्रमुख ग्रॅण्ड मास्टर वसुदेव मसुरेकर यांनी विविध उपक्रमांचा वेध स्लाइड्स मार्फत करुन दिला. यामध्ये “आदिवासी मुलांसा़ठी राबवण्यात येणार्‍या विविध योजना असतील”. “धान्य दान” “कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी सोयी सुविधा,” “मोफत शिक्षण,” ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या,” विशेष म्हणजे त्यासाठी लागणार्‍या निधी संस्थेचे सभासद करत आहेत. तसेच आपत्कालीन स्थितीत उदाहरणार्थ भूकंप, पूर, नैसर्गिक प्रकोपाच्या समयी फ्रीमेसनरी अग्रस्थानी असल्याचे ते पुढे म्हणाले. महारा़ष्ट्रातील अनेक दुर्गम भागांमध्ये मुलभूत सोयी सुविधा पुरवण्याचे कार्य देखील सुरु असल्याची माहिती मसुरेकर यांनी यावेळेस दिली. त्याचप्रमाणे देशाचं भविष्य असणार्‍या तरुण पि़ढीला नजरेसमोर ठेवून त्याच्यासाठी देखील अनेक उपक्रम राबण्यात येत आहेत.

“फ्रीमेसनरी” संस्थेने इतिहासात प्रथमच आपल्या कार्यपद्धतीची माहिती करुन देण्यासाठी मुंबईतील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी “फ्रीमेसन टेम्पल”, तिथल्या रचनेची व कामकाजाची माहिती, सर्वधर्मसमभाव या संकल्पनेवर विश्वास असल्याने धार्मिक ग्रंथाची मांडणी केलेली दिसून आली. एकुणच या ऐतिहासिक वास्तूची ओळख ही देखील एक तिथे उपस्थित असणार्‍यांसाठी नाविन्याची बाब होती.

मानवतेची मूल्य आणि बंधूत्वाच्या तत्त्वावर आपला पायाभक्कम रोवून उभी असून “फ्रीमेसन” संस्थेचे अनेक मान्यवर सदस्य राहिले असून यामध्ये डॉ. राजगोपालाचारी, डॉ. राजेंद्र प्रसाद, उद्योगपती जे.आर.डी. टाटा, पंडित मोतीलाल नेहरु, बलराज सहानी, क्रिकेटर मन्सूर अली पतौडी, अशोक कुमार, संपतराव गायकवाड, स्वामी विवेकानंद, आदि प्रसिद्ध मान्यवरांचा समावेश आहे.

भारतासारख्या विकसनशील देशासाठी फ्रीमेसनरी सारखी संस्था निर्पेक्ष भावनेने सामाजिक जबाबदारी उचलून इथल्या प्रगती सोबतच नीतीमूल्य रुजवून, अनोखा आदर्श निर्माण करत आहे, जेणेकरुन समाज, राष्ट्र व धर्माचं स्थान आपल्या आयुष्यात सर्वोच्च राहिल हे नक्की !

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..