नवीन लेखन...

सामाजिक शिष्टाचार – वक्त्याचे सादरीकरण

कार्यालयीन कामकाज तसेच समाजात वावरताना कोणत्या शिष्टाचारांचे पालन केले पाहिजे याविषयीचा एक प्रदीर्घ लेख सुप्रसिद्ध लेखिका

“माणिक खेर” यांनी “मराठीसृष्टी”च्या दिवाळी अंकात लिहिला होता. याच लेखावर आधारित ही क्रमश: मालिका.


श्रोत्याने वक्त्याचे बोलणे ऐकणे जसे महत्वाचे तसेच वक्त्यानेही श्रोत्याचे लक्षवेधक बोलणे महत्वाचे. अगदी हजारोंच्या सभा गाजवणारे वक्तृत्व प्रयत्नपूर्वक कमवावे लागते. पण मिटींगमध्ये आपले म्हणणे मांडण्यासाठी लागणारी वक्तृत्वकला थोड्या प्रयत्नाने सहज साध्य होऊ शकते. मिटींगमध्ये काही अहवाल सादर करायचा असेल तर त्यातले सर्व बारकावे आधी आपल्याला माहीत हवेत. दुसर्‍याच्या संभाव्य शंका कुशंका यांचाही विचार करून ठेवावा लागतो. थोडक्यात वक्त्याने पूर्वतयारी म्हणून श्रोत्याच्या भूमिकेतूनही आपल्या सादरीकरणाचा विचार करावा लागतो.

आजकाल सादरीकरणासाठी पॉवर पॉइंट या संगणक प्रणालीचा सर्रास वापर केला जातो पण तो करताना काही गोष्टींचे ध्यान ठेवणे जरूर आहे.

१) प्रोजेक्टरच्या पडद्यावर दाखविण्यासाठी लांबलचक वाक्ये लिहू नयेत. ती वाक्ये वाचताना बोलण्याकडे दुर्लक्ष होते. तेव्हा वक्त्याचे बोलणे ऐकायचे की प्रोजेक्टरच्या पडद्यावर दिसणारा मजकूर वाचायचा असा ऐकणार्‍याच्या मनात संभ्रम निर्माण होतो. म्हणून पडद्यावर केवळ मुद्दे, मुख्य शब्द किंवा आकृती दाखवावी व तोंडी विवेचन करावे.

२) सर्व विवेचन करताना आढ्याकडे, जमिनीवर अथवा खिडकीबाहेर न बघता, श्रोत्यांकडे बघत बोलावे. शक्य होईल तेवढ्या प्रत्येक श्रोत्याच्या डोळ्याला डोळा भिडवावा. म्हणजे वक्ता व श्रोता यांच्यात एक बंध निर्माण व्ह्यायला मदत होते. तसेच त्यांची प्रतिक्रियाही अजमावता येते.

३) विवेचन करताना फार लांबण लावू नये. शेवटी सर्व मुद्द्यांचा एकवार परामर्श घेऊन तात्पर्य सांगावे व श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी. त्यांच्या प्रश्नाची शांतपणे उत्तरे द्यावी.

४) असे सादरीकरण करताना वेळेचे भान तर आधी ठेवावे लागते. नेमक्या वेळात सर्व मुद्दे मांडणे ही एक कला आहे. ती सवयीने अंगवळणी पडते.

५) सादरीकरण करताना भाषेवर हुकमत असणे गरजेचे आहे. व्याकरणाच्या चुका ऐकणार्‍यावर चांगली छाप पाडू शकत नाहीत.

६) भाषा केवळ शुद्ध, व्याकरणयुक्त असून चालत नाही. तर आपले म्हणणे दुसर्‍याला नेमकेपणाने समजवण्यासाठी नेमकी शब्द योजना करावी लागते. त्यासाठी डोळसपणे वाचन, शब्दकोशाचा वापर करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

— माणिक खेर
बी-७ (पूर्व) वृंदावन सोसायटी, रेंज हिल्स रोड, पुणे ४११०२०

## सामाजिक शिष्टाचार
## Part 7

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..