नवीन लेखन...

समूहाचा पराभव !

दरवर्षी दिवाळी अंकांची लायब्ररी लावण्याची आमच्या घरातील जूनी परंपरा ! वडिलांनी भुसावळ पासून जोपासलेली – ते व्रत आजतागायत सुरु आहे. एके दिवशी वडिलांनी एक मासिक माझ्यासमोर टाकले आणि म्हणाले- ” यातील रत्नाकर मतकरींची ” जौळ ” ही कादंबरी वाच.”

मी पडत्या फळाची आज्ञा स्वीकारून ती एका बैठकीत वाचून काढली. खूप परिणाम झाला मनावर ! खेड्यातील कीर्तनकार जैतापूरकर बुवा , त्यांची मुलगी नयन ! तिचे प्रसाद शी लग्न होते. आणि तरुण जोडपे विरुद्ध सासू (रीमा लागू) यांच्यातील सनातन संघर्ष ! या छळाला कंटाळून शेवटी मुलगा प्रसाद (अजिंक्य देव) आईशी (सिंधू ताई) बोलणे टाकतो. म्हातारी दुखावते, पोराच्या विनवण्या करते. ” दृष्ट लागण्या जोगे सारे ” या मोघ्यांच्या शब्दांना न जागता सासू सुनेच्या नात्याला दृष्ट लागते आणि मुंबईच्या लोकलमधून हे जोडपे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यात प्रसाद जातो पण नयन वाचते. तिच्या पोटातील जीव वाचविण्यासाठी ती सासूकडे परतते. चित्रपटाचा शेवट हृद्य आणि चटका लावणारा आहे.

जैतापूरकर बुवांच्या भूमिकेत यशवंत दत्तने त्याची गौरवशाली ऊंची उभी केली आहे. जेव्हा अपघाताचे वृत्त त्यांना कळते आणि जावई गेला पण मुलगी बचावली असं सांगितलं जातं तेव्हा ते समतोल साधतात- जन्मभर कथन केलेलं अंगी बाणवतात आणि म्हणतात-

” पांडुरंगाचे नाव जन्मभर घेऊनही देव माझ्याशी असं का वागला असं का विचारता? तो काही लाच घेत नाही. नामस्मरणाने फक्त सोसण्याचे बळ वाढते. आपलं प्रारब्ध शेवटी आपल्यालाच भोगावे लागते. ( मोघ्यांनी एका गीतात लिहिलंय- ” मनाचिया घावांवर मनाची फुंकर “) तेव्हा सत्य हे नयनला सांगावेच लागेल. ”

हा चित्रपट लागल्यावर आम्ही तो उत्सुकतेने पाहिला. कथा -पटकथा -संवाद (मतकरी), दिग्दर्शक (राजदत्त), कलावंतांमध्ये – शेखर नवरे, प्रिया बेर्डे, भैय्या उपासनी ( गोट्या फेम), अनंत महादेवन अशी तगडी मदतनीस टीम, हे सगळं असूनही चित्रपट तितकासा भावला नाही.

मुग्धा चिटणीस नंतर काही काळ वपुं बरोबर कथाकथनाला साथीदार म्हणून असायची. अभिनयाचा पहिला घास तिला तितका पेलला नाही. अजिंक्य देवही त्याच्या प्रतिमेबाहेर जाऊन फारसा न्याय देऊ शकला नाही प्रसादला ! रीमा खाष्ट , छळ करणारी सासू वाटली नाही , फारतर उग्र ( डोळ्यांमधील छटांमुळे ) वाटली.

मतकरींची एकटाकी लेखणी अधिक प्रभावी , चित्रदर्शी वाटली. माध्यमांतरात अशा तुलना अपरिहार्य , पण  चित्रपट कादंबरीच्या आसपास पोहोचू शकला नाही.  सगळं इंटेन्स नाट्य डायल्युट झालं आणि त्यामुळे निराशा झाली.

चित्रपट ही सामूहिक घटना असली तरी मतकरींच्या एका लेखणीपुढे प्रभाव निर्माण करण्यात समूह पराभूत झाला.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..