बांधण हे पेझारीजवळील एक अतिशय शांत, निसर्गरम्य आणि प्रदुषणमुक्त गाव. ग्रामीण संस्कृतीचा वारसा पुढे नेणार्या या अतिशय स्वच्छ गावात अनाथ मुलांच्या जीवनात आनंद आणि उमेद फुलवणारी, त्यांच मुलपण जपता जपता त्यांना पुढील स्पर्धेसाठी शैक्षणिकदृष्टया आणि वैचारिकदृष्टया सजग बनवणारी, इतकेच नव्हे त्यांच्या संपुर्ण शैक्षणिक आणि नोकरी लागेपर्यंतच्या सर्व खर्चाची तरतुद करणारी, आणि पुढील भविष्यांत त्यांच्यामधील निती-मुल्य जपणारी एक N.G.O. (Non-Governmental Organisation) Eg.kts Samparc (social action for manpower creation). ; NGO मधे साधारण ६ ते १८ या वयोगटांमधील मुलं वाढवली जातात, व अनाथ मुलांना विशेष ओळख आणि कीर्ती मिळवून देण्याच ध्येय इथे गेल्या बारा वर्षापासून अविरतपणे साध्य केलं जात आहेण् या छण्ळण्व्ण् च वैशिष्टय म्हणजे इथे आढळणारी मुलींची लक्षणीय संख्या! सध्या इथे फक्त १० मुलं आणि ४३ मुली अतिशय प्रेमाने, आपुलकीने आणि कडक शिस्तीने वाढवली जात आहेत. केवळ त्यंाचं पालनपोषण ही या N.G.O. ची जबाबदारी नसून त्यंाचा व्यक्तिमत्व विकास, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन पदव्युत्तर शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि नोकरी या सगळया जबाबदार्यांची आणि त्यासाठी लागणार्या खर्चाची पूर्तता या N.G.O. कडूनच केली जाते. अभ्यासाबरोबरच इतर कलाकौशल्यांचा जसे कराटे, नृत्यए गायन वादन विविध प्रकारचे शारीरिक आणि मानसिक खेळ व्यायामप्रकार इ. चा आदर इथे केला जातो आणि त्यामुळे इथून बाहेर पडलेली मुले ही फक्त हुशारच नाही तर विचारशील, संवेदनशील, भावनिक, प्रतिभावंत, वास्तववादी आणि सर्व कलांची चाहती असतात. मुलांवर एखाद्या गुरुकुलाप्रमाणेच इथे संस्कार कले जातात, त्यांना अगदी भल्या पहाटे उठवून योगासनांचे प्रकार, गावातून एक धावत रपेट आणि वैयक्तिक स्वच्छता आटोपून त्यांची सकाळी १०.३० वाजेपर्यंत शिकवणी असते. त्यात सर्वांनी आपापला अभ्यास करायचा असतो. गणित आणि विज्ञानाच्या अभ्यासावर भर दिला जातो. शिकवणीचा वेळ सोडला तर इतर वेळी मात्र इथे अतिशय खेळीमेळीचं वातावरण असतं पारावर बसून मुलांचा धांगडधिंगा सुरु असतो, काही ठिकाणी घोळक्यांनी गप्पा गोष्टी करणार्यांच्या विनोदांना भरती आलेली असते, कुठे कुणाची थट्टा मस्करी किंवा खिल्ली उडवणं चालू असतं, तर कुठे अतिशय शांतपणे एखाद्या गोष्टीवर संभाषण किंवा विचारविनिमय सुरू असतो. इथल्या सर्व मुलांमध्ये एक घट्ट मैत्रीचं नातं निर्माण झालेलं असतं आणि त्याला वयाची अट नसते. कारण ही सर्व मुलं लहानपणापासूनच एकत्र वाढलेली असतात. ही मुलं जेव्हा शिकवणीच्या चार भिंतींच्या बाहेर पडतात, तेव्ही ती त्यांचा विचार करायला, त्यांच्या पध्दतीने जीवन जगायला मुक्त असतात. इथे त्यांना केवळ सल्ले दिले जातात, आज्ञा नाही. या NGO चे आणखी एक वैशिष्टय म्हणजे मुलांना दिला जाणारा वैविध्यपूर्ण सकस आणि आरोग्यदायी नाष्टा आणि जेवणण् नाष्टयाचे वार ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे कांदा पोहे, साबुदाणा खिचडी, उपमा, इडली असा रूचकर नाष्टा इथे बनवला जातो. जेवणात डाळ, भात, भाजी, पोळी , कोशिंबीर, ताक इ.पदार्थांचा समावेश असतो. सणासुदीला गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात आणि या संस्थेला अगदी नखशिखान्त सजवलं जातं. या NGO मधील मुलांचा स्वतःचा डान्स ग्रुप आणि लेझीम ग्रुप आहे, तसेच मुलांच्या इतर छंदांना आणि कौशल्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्या त्या क्षेत्रातील शास्त्रीय शिक्षण आणि अनुभव देण्यासाठी ही N.G.O. नेहमीच प्रयत्नशिल असते. म्हणूनच सफाईदार चित्र काढणार्यांना महाराष्ट्र शासनाच्या इलिमेंटरी {Elementary} आणि इंटरमिजिएट {Intermediate} परिक्षांसाठी तयार करण्यात येतं आणि नुकतीच या N.G.O. मधील एक विद्यार्थीनी रायगडमधून पहिली तर महाराष्ट्रातून आठवी आली. या N.G.O. मधील काही मुले कराटेचं संपूर्ण प्रशिक्षण घेवून इंडो-नेपाल चँम्पियनशीप स्पर्धेपर्यंत मजल मारुन आलेली आहेत. अतिशय हलक्याफुलक्या वातावरणात वाढलेल्या या मुलांना NGO कडून भक्कम मानसिक आधार आणि आर्थिक पाठबळ मिळतं. शालेय साहित्य आणि स्वच्छ गणवेश तसेच मुलांचा मानसिक ताण दूर व्हावा म्हणून त्यांच्यासाठी एक लेडी कॉन्सेलर नेमली गेली आहे. आपल्या सर्व समस्या, अडचणी, दुःखं आणि स्वप्नं यांच्याबद्दल ते कॉन्सेलरकडे मन हलकं करतात. मुलांना सांभाळणं हा या संस्थेचा व्यवसाय नाही तर हौस आहे. मुलांवर लक्ष ठेवायला एक केअर टेकर, कॉन्सेलर, ४ शिक्षीकाए हाऊस मेकरस् आणि एक मदतनीस असा या संस्थेचा कायमस्वरूपी स्टाफ आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून ही NGO अनेक दुर्बल मुलांना शालेय गणवेश आणि साहित्य पुरवते. दर महिन्याच्या नोव्हेंबरमध्ये मुलांना एखाद्या ऐतिहासिक वास्तूत किंवा थंड हवेच्या ठिकाणी सहलीसाठी नेलं जातं. दरवर्षीच्या स्नेहसंमेलनात मुलांना आपल्या कला सादर करण्याची संधी मिळते आणि या प्रसंगी अनेक हितचिंतकांना, देणगीदारांना, रोटरी क्लबच्या सभासदांना, जैन समुदायाला आणि स्थानिक व्यापारी संघटनांना आमंत्रित केल जातं. तज्ञ लोकांना वेळोवेळी या NGO मध्ये सत्र घेण्यासाठी बोलावण्यात येतं, मुलांच्या विचारकक्षा आणि ज्ञानकक्षा रुंदावण्याचा हा प्रयत्न असतो. तसेच वयात येणार्या मुला-मुलींच्या बदलत्या शारिरीक आणि भावनिक गरजा ओळखून त्यांच्यासाठी काही खास सत्रे आयोजली जातात. मध्यंतरीच, पुण्यावरून आलेल्या दोन महिलांनी येथील मुलींना लैंगिक समस्यांबद्दल आणि पाळयांमध्ये घ्यावयाची काळजी, या विषयांवर मार्गदर्शन केले. ही NGO ऐकूणच मुलांच्या चौफेर विकासाबद्दल, कौटुंबिक पालनपोषणाबद्दल, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आलेखाबद्दल आणि वर्तणुकीबद्दल कमालीची दक्ष असते. लहान मुलांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी आसपासच्या शाळांमध्ये पाठवलं जातं. सुट्टीमध्ये मात्र मुलांना घरीच (म्हणजे NGO मध्येच) विणकाम, शिवणकाम, भरतकाम, संगणकावरील काम, जेवण बनविणे इ.गोष्टींबाबतच प्रशिक्षण दिलं जातं.
— अनिकेत जोशी
Leave a Reply