तुझं असं येणं सोसवत नाही मला …
प्रारब्धाचे आसूड झेलत
उन्मादाचा प्रपात कोसळत
असतांना , तुझं माझ्यासाठी येणं…
सोसवत नाही मला …
बेबंद समाजाचा माज
उतरवताना तुझी
होणारी तगमग,
सोसवत नाही मला ….
रूढी,परंपरा यांच्या शृखंला
अलगद सोडवतांना
रक्तबंबाळ झालेेली तुझी
नाजूक पावलं पहावत
नाहीत मला ….
येशील कधी तरी तेंव्हा
साम्राज्ञी सारखी ये ….
माझ्या हृदयस्त सिंहासनाचा ताबा घे …
हळ्व्या नात्यांचा ,हळव्या शपथांचा
हुंकार श्वासात भरून ये….
मी देईन सौभाग्यांचं लेणं,
दोन धगधगते नागमणी….
जे तुझ्या समर्थथेची साक्ष देतील…
तुझ्या अश्रुंचे माणिकमोती
वेचणं आता सोसवत नाही मला….
©लीना राजीव.