संधी गवसली त्याने मारीला
यवनांचा वेढा
आप्तीष्ट गमवुनी बसला वेडा
वाढूनी गेला तिढा!!
अर्थ–
हुशार, धेय्य वेडा, जिगरबाज व्यक्ती नेहमीच यश संपादन करतो पण, या सगळ्या बरोबर जर समयसुचकता, प्रसंगावधान आणि योग्य संधीची उकल असेल तर यशाबरोबर समाधान सुद्धा प्राप्त होऊ शकते.
वेडात मराठे वीर दौडले सात, हे गाणं आणि त्यातल्या घटनेची माहिती आपल्याला माहितीच आहे. केवळ धेय्य समोर ठेवून चालले की एखादी चूक घडणे हे शक्य आहे आणि त्यात मिळणाऱ्या यशापेक्षा नुकसान होण्याची भीती जास्त.
माणूस एखादी गोष्ट बरोबर करतोय की चुकीची करतोय हे महत्त्वाचं नाही तर काय किंमत मोजावी लागत्ये त्यासाठी त्यावर त्याचे मूल्यमापन होतं. स्वराज्य निर्माण करण्यासाठी एकला चलो रे न म्हणता, सारे जण एकत्र पुढे जाऊया या तत्वावर महाराजांनी भर दिला आणि म्हणून आणि म्हणूनच स्वराज्य निर्माण होऊ शकलं.
हातात हात घेऊन पुढे जाणं हिताचं. नाहीतर केवळ स्वहित प्राप्त होऊ शकते पण त्यासाठी स्वकीयांचा बळी जातो.
‘हे विश्व ची माझे घर’, ‘चिंता करितो विश्वाची’ सारखे विचार आता रूजणे कठीण आहे पण गरजेचे ही तेवढेच आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply