वेदना विपन्नावस्थेची सारी भोगूनी झाली..
तरीही प्रारब्धयोगे सारे सुखऐश्वर्य लाभले..
तरीही जीव हा मोहपाशात कां ? गुंतलेला..
वाटते जीवा ! बरेच काही अजूनही राहिले..।।..१
सांग मना , आज तुज जवळ काय नाही..
तुज श्रेष्ठ विवेकी जन्म लाभला मानवाचा..
वात्सल्यप्रीतीच्या सरोवरी तुडुंब रे डुंबला..
अनंत जन्मांचे हे भाग्य अलौकिक आगळे..।।..२
आज जीवात्म्यावर मंडरते रे सांज केशरी..
आत्माही भाळला श्रीरंगी मंजुळ वेणूवरती..
जीव आता मुक्तीच्या त्या विरक्त वाटेवरती..
तरी कां भासते जगायचे बरेच काही राहिले..।।..३
जन्मासंगेच मृत्यू , हेच सुर्यप्रकाशी सत्य..
त्या सत्याची दोरी त्या अनामीकाच्या हाती..
युगायुगांची पराधिनता ही तुझीच रे मानवा..
हव्यास कशाला अजुन काही जगायचे राहिले..।।..४
©️ वि.ग.सातपुते..(भावकवी)
9766534908
रचना क्र.५१/ २-४-२०२१
Leave a Reply