नवीन लेखन...

पुण्यातील संगीत महोत्सव

गणपती, दसरा- दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनंतर पुण्यात संगीताचे वेगवेगळे महोत्सव एकानंतर एक चालु असतात. सवाईगंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, स्वरगंधार आणि शेवटी वसंतोत्सव. सवाईच्या सीझन तिकीटसाठी आतुन फिल्डिंग लावल्यास लाईनमधे उभे राहण व निराशा टाळता येउ शकते, स्वर गंधारमधे स्टुडंट डिस्काउंट असते तर वसंतोत्सव चक्क फ्रीच असतो. तिन्ही कार्यक्रमांसाठी खचाखच गर्दी होत असते. झुंडीने होणार्या ह्या गर्दीत दर्दी आणि “बेदर्दी” दोन्ही गटांचे सभासद आढळतात.

दर्दी गटाचे सभासद, कलाकारांची नावे जाहीर होताच सीझन का रोजच तिकिट? हा निर्णय पक्का करतात तर दर्दीतील काही, आँफीस वगैरे कारणांनी पर डे किंवा फक्त शनिवार संध्याकाळच तिकिट पक्क करतात. पंडीत हरीप्रसादजी, विदुषी श्रीमती प्रभा अत्रे, पंडीत जसराज, पं शिवकुमार या सारख्या बुजूर्ग कलाकारांबरोबर एक दोन उभरत्या कलाकारांच्या बहारदार संगीत नजराण्याची ही मंडळी अतुरतेने प्रतिक्षा करत असतात. योग्य जागी दाद देण्यात ही मंडळी कचरत नाहीत.

दर्दींच्या गर्दीमधे “बे’दर्दी” गटाचे सभासद बेमालुमपणे एकरुप होउन जातात. अशांना हेरण्यासाठी काही दशकांच्या संगीत महोत्सवांचा अनुभव पाठीशी असणे व प्रबळ निरीक्षणशक्ती असणे आवश्यक असते. प्रत्येक बेदर्दीच्या हजेरी मागील हेतू वा प्रेरणा भिन्न आणि रंजक असतात. उदा. काहींना आयोजकाच्या स्टाफने गळ्यात मारलेला दहा वीस हजाराचा भुर्दंड पवसील करायचा असतो तर काहींच्या बाबतीत दुसर्याचा फ्री पास अचानक गळ्यात पडलेला असतो. काही स्टाँलवरील वेगवेगळ्या खाद्य पदार्थांच्या गंधाने आकर्शित होतात तर काही सभासदांना “पुढचा स्टेज परफाँरमन्स आपलाच आहे ” अशा पहेरावात वावरता येण्यासाठी महोत्साव हा खात्रीशीर समारंभ वाटतो तर काहींना मित्र परिवाराच्या वार्षिक संमेलनासाठी कार्यस्थळ ही वहीवाटीची जागा वाटते, वगैरे.

माझ्या निरीक्षणाचे प्रमुख भक्ष व खाद्य म्हणजे बेदर्दीमधील भटक्या, विमुक्त जातीचा टेहळणी गट. या गटासाठी तर महोत्सव म्हणजे नेत्रसुखाची परवणीच असते. गढवाल कलकत्ता, बनारस पासुन पशमीना साड्यांंची फुल रेंज, काश्मीरी कशिदा, गळ्यात ठुशी पासुन स्वोरोस्की रिंगज् सर्व काही असल्याने त्यांच्यासाठी एका छताखाली इथे जाणु काही लाइव्ह रँप शो असतो!!

बेदर्दीतील उपगट खवैयांचा असतो व भुकेपोटी, काही दर्दी या गटात सामील होउन एक संमीश्र खवैया गट तयार होतो जो शक्यतो पाठ टेकता येइल अशी जागा पकडुन सतरंजी टाकतो व दोघा तिघांची स्टेजकडे पाठ झाली तरी हरकत नाही पण मधोमध ठेवलेल्या पाच पुडाच्या डब्यातील एवज आपल्या पेपर डिश मधे कसा समाउन घेता येईल या प्रयत्नात असतो.

विशेषत: सवाईगंधर्व मधे, विशिष्ठ कलाकाराच्या हजेरीच्या वेळेला, ठराविक प्रेक्षकवर्ग परंपरागत हक्काची interval समजुन पांगतो व वेगवेगळ्या stallवर अचानक गर्दी वाढते. बेदर्दींच्या उत्साहाला अशावेळी उधाण येते.

कोणाही बेदर्दी सदस्याला जर आपण विचारल की कोण गातय? किंवा कोणता राग आहे? तर हसत, हसत ” मी आत्ताच आलोय ” अस म्हणत तुम्हाला तो तुमच्या प्रश्णासकट झटकुन टाकतो.

बेदर्दी जातकुळीच्या अशाच एका सभासदानी मला शालेय जीवनात विचारलेला ” सवाई गंधर्व एकटे तीन दिवस गातात का? ” हा प्रश्ण मी आयुष्यात विसरु शकत नाही.

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

1 Comment on पुण्यातील संगीत महोत्सव

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..