राम मराठे हे पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतबुवा मिराशी, मास्तर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खाँ व पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले. त्यांचा जन्म २३ आक्टोबर १९२४ रोजी झाला. पं गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. राम मराठे यांचे मंदारमाला हे नाटक पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, जयंतराव साळगावकर, गुणिदास, सी. आर. व्यास, मन्नाडे, जयदेव, नौशादअली, पं. जसराज, पं. जितेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, किशोरीताई आमोणकर, कुसुमाग्रज अशा अनेक मान्यवरांनी पुनःपुन्हा पाहिलं असून, नाटकावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.
मंदारमाला म्हणजे ‘कल्पवृक्ष!’ आणि म्हणूनच ‘मंदार’च्या भूमिकेतील बाबांची गायकी आणि संगीत दिग्दर्शन हाच रसिकांच्या मनावर ‘संगीतरूपी कल्पवृक्ष’ कोरला गेला आहे आणि त्यांचे ‘नादब्रह्मी सूर’ चिरंतन स्मरणात राहतील. एके काळी नाटय़पदे गाणाऱ्या गायकाकडे काहीशा तुच्छतेने पाहिले जात होते. मात्र, शास्त्रीय गायन श्रेष्ठ आणि संगीत नाटकातील गायन कनिष्ठ असा भेद असू नये ही शिकवण पं. राम मराठे यांनी दिली. जन्मभर अथकपणे अक्षरशः अगणित मैफिली, नाट्यप्रयोगांतून मायबाप रसिकांना ज्यांची “सूरगंगा मंगला ” रिझवत राहिली…भिजवत राहिली. पं.राम मराठे प्रखर राष्ट्रभक्त होते. म्हणूनच आपल्या नाटकाच्या प्रयोगानंतर आणि गाण्याच्या बैठकीत भैरवीनंतर ते संपूर्ण ‘वंदे मातरम् ‘ म्हणत. पं.राम मराठे यांचे निधन ४ आक्टोबर १९८९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पं.राम मराठे यांची संगीत संपदा
अगा वैकुंठीच्या राया
कशि नाचे छमाछ्म्
कोण अससि तू न कळे
कांता मजसि तूचि
गुरु सुरस गोकुळीं
जय शंकरा गंगाधरा
जयोस्तु ते हे उषादेवते
तारिल हा तुज गिरिजाशंकर
ती सुंदरा गिरिजा
दुनियेच्या अंधेर नगरीचा
दे चरणि आसरा
धनसंपदा न लगे मला ती
निराकार ओंकार साकार
नुरले मानस उदास
बसंत की बहार आयी
विश्वनाट्य सूत्रधार
सप्तवसूर झंकारित बोले
सूख संचारक पवन
सूरगंगा मंगला
हरिहरा ओंकार मनोहर
हरी मेरो जीवनप्राण-अधार
हे सागरा नीलांबरा
Leave a Reply