जगण्याची साधी सोपी सूत्रे – एकशे सत्तावन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग पंधरा
दातांनी नखे कुरतडू नयेत.
काही वेळा सवय म्हणून तर काही वेळा शरीराची आवश्यकता म्हणून नखे खायची सवय जडते. जी चुकीची आहे.
नखांमधे घाण साठलेली असते. नखे दातानी कुरतडल्यामुळे ती सर्व घाण आपल्याच पोटात जाते, हे आपण इयत्ता तिसरीत शिकलेलो आहोत.
कुरतडण्यापेक्षा आणखी वाईट सवय म्हणजे नखे खाणे. काही जणांना एवढी वाईट्ट सवय असते की त्यांच्या नखांचे खाऊन खाऊन पार धनुष्यच करून टाकलेले असते.
नखावरून अनेक गोष्टींची परिक्षा होत असते. शरीरीतील अस्थि धातूचे संहनन किती आहे,संहनन म्हणजे शक्ती, अंदरूनी ताकद ! आजच्या भाषेत कॅल्शियम लेव्हलचा अंदाज बांधता येतो. अर्वाचीन शास्त्रानुसार ह्रदयरोगाची पूर्वस्थितीचे अनुमान करता येते. कामाचे स्वरुप समजते. रक्तधातुची क्षमता समजते. तुकतुकीतपणावरून शरीरातील स्निग्धत्व समजते, त्यावरुन वाताच्या स्थितीचा अंदाज बांधता येतो.
नखांना सुस्थितीत ठेवावे. प्रसंगी नखांचा शस्त्र म्हणून वापर करता येतो तेवढी ती पाजळून तयार ठेवावीत. म्हणजे लांब वाढवू नयेत. शस्त्र म्हणून जेव्हा नखे वापरायची असतात, तेव्हा ती वाढलेली असता नयेत, नाहीतर ती तुटण्याचीच शक्यता जास्ती असते.
सध्या नेलआर्ट नावाची कला व्हायरल म्हणजे प्रसारीत होत आहे. पूर्वी निदान एकच रंग लावला जाई. आता मल्टीकलर. त्यावरील रंग घातक असतात. ते रंग पोटात जातात, एकवेळ नखं खाणं परवडलं पण हा रंग ? ना रे बाबा ना ! पोटात जाऊन अनेक व्याधी होण्यापेक्षा नखं न वाढवणं बरं.
आता तर नखं पण कृत्रिमरीत्या बसवता येतात. कृत्रिमरीत्या नखे वापरायची एवढीच हौस असेल तर शिवरायच व्हावे. प्लॅस्टीकची वापरण्यापेक्षा चक्क पोलादी वाघनखेच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१५.०९.२०१७
Leave a Reply