सायंकाळी क्षितिजावरती
पहा पसरल्या सांजसावल्या ।।
पाहुनीया मोहक रंगछटा
मनमोराचा फुले पिसारा
किती साठवू नयनी नजारा
वाटे ढगांवर पसरला पारा ।।१।।
सायंकाळी क्षितिजावरती
पहा पसरल्या सांजसावल्या ।।
डोहात नदीच्या चमके धारा
लाटांवर खेळे अवखळ वारा
काठावर उभा निष्पर्ण वृक्ष हा
आकाशातून आला फिरवून खराटा ।।२।।
सायंकाळी क्षितिजावरती
पहा पसरल्या सांजसावल्या ।।
एकत्र पाहुनी हा देखावा
मज गमे होतसे भास हा
समोर उगवती रंगीत उषा
की मजपुढे साक्षात निशा ।।३।।
सायंकाळी क्षितिजावरती
पहा पसरल्या सांजसावल्या ।।
रंगीत आकाश दिसे जणू
तान्हुले सुकुमार बाळ अन
निष्पर्ण झाड वाटे मज जणू
आजीचा सुरकुतलेला हात हा ।।४।।
सायंकाळी क्षितिजावरती
पहा पसरल्या सांजसावल्या ।।
@ मी सदाफुली
✍️ संध्या प्रकाश बापट
Foto click by Ramesh Pawar
Location – Chindhavali
Leave a Reply