किती, कसे, कुठे शोधू तुला
अशी कुठे? तूं हरवुनी गेली…
लोचनी रूप तुझेच लाघवी
पापणी, नित्य पाणावलेली…
प्रतीक्षेत हरविले दिन ते सारे
क्षितिजी सांजाळ थबकलेली…
निलांबरी, मोहोळ आठवांचे
निमिषात तूंच उठवूनी गेली…
हे सारे, आज कसे विसरावे
अशी कुठे गं तूच हरवून गेली..
प्रीतिवीण कां? जगणे असते
धुंद श्वासात, गंधाळते बकुळी
शीणलो तरी वाटते तुला पहावे
सांजाळलेल्या या कातरवेळी
रचना क्र. ११२
२२/८/२०२३
– वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
Leave a Reply