संजय गांधी यांचा जन्म १४ डिसेंबर १९४६ रोजी झाला.
संजय गांधी भारतीय राजकारणातील अत्यंत लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या आसपास आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे संजय गांधी हे १९७७-७८ च्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. काँग्रेसमध्ये त्यांना इंदिरा गांधींनंतर पक्षाचा चेहरा मानले जात होते. त्याचे कारण म्हणजे राजीव गांधींना राजकारणात काहीही रस नव्हता. पण त्यांच्या अवेळी झालेल्या मृत्यूमुळे देशाला आणि भारतीय राजकारणाला मोठा धक्का बसला.
संजय गांधी यांनी मॉडेल असलेल्या मनेका यांच्या बरोबर लग्न केले होते. लग्नाच्या वेळी संजय मनेका यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठे होते. संजय यांच्याशी विवाहानंतर मनेका यांनी त्यांची बॉम्बे डाइंगची जाहिरात नष्ट केल्याचे म्हणले जाते.
त्याकाळातील राजकीय इतिहास तज्ज्ञांच्या मते त्यावेळी संजय गांधी आणि मनेका गांधी देशातील राजकारणात एक पावरफुल कपल म्हणून समोर आले होते.
संजय गांधींना वेगाने गाडी आणि विमान चालवणे आवडत होते.
संजय गांधी यांचे २३ जून १९८० साली एका विमान अपघातात निधन झाले.
Leave a Reply