नवीन लेखन...

संजीवनी रायकर

शिक्षक मतदार संघातून अनेक वर्षे आमदार म्हणून निवडून येत असलेल्या श्रीमती संजीवनी रायकर म्हणजे आमदार कसा असावा याचे उत्तम उदाहरण.

सतत राज्यभरातील शाळांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करायच्या. आपल्या मतदार शिक्षकांशी सातत्याने संवाद साधायचा आणि अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लावायचे हे कार्य त्यांनी निष्ठेने केले. अतिशय साधेपणाने राहणाऱ्या संजीवनी ताई म्हणूनच सर्वांना प्रिय होत्या. सध्याच्या काळात एखादा नगरसेवक देखील स्वतःच्या महागड्या चारचाकी वाहनातून फिरत असतो। याउलट संजीवनी ताई अनेक वर्षे बस मधून प्रवास करत असत. एकदा तर त्या मुंबईपासून पाचशे किलोमीटर असलेल्या देवगडला एसटीच्या लालपरी मधून गेल्या होत्या. महाड येथे बस थांबली तेव्हा वाहकाने तिथल्या वाहतूक नियंत्रकाला सांगितले की आमदार बाई बस मध्ये आहेत। त्यावर वाहतूक नियंत्रकाला संशय आला ही बाई बनावट तर नसेल ना? सहसा कोण आमदार एसटी बसमधून प्रवास करणार आहे आणि म्हणून वाहतूक नियंत्रक स्वतः खातरजमा करून घेण्यासाठी संजीवनी ताईंच्या आसना पाशी येऊन अतिशय अदबीने त्यांनी त्यांचं आमदाराचं ओळखपत्र दाखवायला सांगितलं आणि खात्री करून घेतली। कारण त्यालाही विश्वास बसेना की एक आमदार लाल परी मधून प्रवास करतो ! (स्व. दि बा पाटील असे निवडक अपवाद वगळता)

अशा या साधेपणाने वागणाऱ्या संजीवनीताई बद्दल तीन वर्षापूर्वी मी फेसबुक वर एक पोस्ट लिहिली होती त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या जेव्हा मंत्रालयात जात असत तेव्हा तिथले वॉचमन लिफ्टमन कॅन्टीनमधील कर्मचारी यांच्यापासून ते थेट अधिकारी मंत्री सर्वजण संजीवनीताईना मान देऊन त्यांच्याशी बोलत असत. कारण अगदी चतुर्थश्रेणी कामगाराशी बोलताना देखील त्यांचा स्वर प्रेमळ असे. त्या कधीच कुणाशी उर्मटपणे आपल्या आमदारकीचा रुबाब दाखवून बोलल्या नाहीत.

काही वर्षांपूर्वी बोरिवली येथे एका कार्यक्रमात त्यांच्याविषयी बोलताना कै. गोपीनाथ मुंडे म्हणाले होते, या संजीवनी ताई सतत माझ्याकडे काही ना काही मागायला येत असतात! ते ऐकून श्रोते कान टवकारून बसले. त्यावर थोडा विराम घेऊन गोपीनाथ जी अतिशय अदबीने नम्रतेने पुढे म्हणाले की, होय त्या सतत काही ना काही मागायला येतात पण त्या स्वतःसाठी कधीच काही मागत नाहीत, शिक्षकांसाठी मागायला येतात हा त्यांचा मोठेपणा आहे.

कै. संजीवनी ताईना लाख लाख प्रणाम व श्रद्धांजली.

— चंद्रशेखर श्रीराम ठाकूर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..