…. का करतो आपण संकल्प ?केवळ नवीन वर्षात आपण काही करणार आहोत हे इतरांना सांगण्यासाठी ,दाखवण्यासाठी -की खरोखरच आपण त्यावर गंभीर विचार करून आपल्या आयुष्याला एक निश्चित दिशा देण्याचा प्रयत्न करतो-एक सुनिश्चित मार्ग आखून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा विचार करत असतो..
तसं पाहिलं तर आपण खूप ठरवतो,तयारी करतो,त्या दृष्टीने खूप प्रयत्न करतो पण नेहमी त्याप्रमाणेच घडते असे नाही -खूपदा असाही अनुभव येतो- MAN PROPOSES AND GOD DISPOSES …..नेहमी आपल्या मानाप्रमाणेच घडत नाही,आणि मग आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागतं -इच्छा नसली तरीही-आपला नाईलाजच असतो.आपल्या हातात काहीही राहत नाही.आपण कठपुतळ्या आहोत ना त्या नियंत्याच्या हातातल्या-तो नाचवलं तसेच नाचावं लागतं–आपापले संकल्प पूर्ण करू शकणारे खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजेत.खरोखरच असतात असे लोक-त्यांच्या इच्छा होतात पूर्ण -ते ठरवतात तसाच होतंही -अर्थात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात असे.
…पण मग का करतो आपण संकल्प ?.हो तो केला की आपल्याला आपल्या भविष्यात काय करायचे आहे, कसे करायचे आहे, त्यासाठी काय करावे लागेल याची ही कल्पना येते ,आपण विचार करायला शिकतो त्यासाठी आपण आपल्या मेंदूला थोडा ताण देऊन कामालाही लावतो.तरीही असे म्हटले जाते-आपण आपला पूर्ण मेंदू कधीच वापरत नाही …..माझा स्वतःच- अनुभव हा असाच -नेहमी ठरवल्याप्रमाणे झाले असे नाही-दरवेळी ऍडजस्ट करत जाणे हेच जास्त होते.काही गोष्टी तर कधी ठरवल्या नाहीत,पण अचानक होत गेल्या,मी मात्र दरवेळी एवढं केलं,असेल त्या परिस्थितीचा,वेळेचा फायदा करून घेतला,त्याप्रमाणे स्वतःला MOULD केलं,त्याचा मला फायदाच झाला.मला हिंदी विषयात पुढे पीएच डी करायची होती, पुणे विद्यापीठात उत्तम गाईड लाभले -सहा महिने माहिती मिळवणे वगैरे काम सुरु झाले, –आणि अचानक नवर्याची पुण्याहून बदली झाली,आणि तीही कमांडींग ऑफिसर या पदावर .मी काही दिवस पुण्यात राहिलेही,पण पुढे सोडून जाणे भागच पडले.कारण वायुसेनेत नवरा कंमान्डींग अधिकारी असेल तर पत्नीला तेथे असणे आवश्यक असते.जबाबदारी ची कामे असतात.,बायकांच्या अडचणी समजून घ्याव्या लागतात.मदत करावी लागते.
…..आता तर कसले संकल्प–अपूर्ण कामे आधी पूर्ण करायची आहेत.संकल्प करायचा विचार ही मनात येणार नाही इतकी कामे पुढ्यात आ वासून उभी आहेत.केले होते खूप संकल्प गेल्या वर्षी-पण होणे कठीण वाटतेय -जमलं तर जरूर करणार आहे-बरंच लेखन करायचं आहे, लिहून ठेवलेलं पूर्ण करायचं आहे, दुसर्या पुस्तकासाठी तयारी करायची आहे,-होईल तेव्हां होईल-अर्धं लेखन तयार आहे –
…..हो, आणखी एक मोठं , काम करायचं आहे-अविनाशच्या नावाने काही करायचं मनात घाटत आहे-तयारीला लागले आहेच -ते होणार-
…..स्वतःसाठी विचार करतो तसेच येथे आपल्या ग्रूपचाही विचार व्हावा असे वाटते.वर्षभराचे नियोजन करावयास हवे-वर्षभरात आपण काय काय कार्यक्रम हाती घेणार आहोत,त्यादृष्टीने सर्वांशी संगनमत करून हे ठरवता येऊ शकते.कामे वाटून दिल्यास त्या दृष्टीने तयारीला सदस्य लागू शकतात.
— देवकी
Leave a Reply