नवीन लेखन...

संकल्प आणि कृती

वर्षाचा शेवटचा महिना सुरु झाला की आपणा सर्वांना चाहूल लागत असते ती येणाऱ्या नवीन वर्षाची , आणि मग, या नव्या वर्षात काय काय करायचे ?
काय काय करणार आहोत ? याची यादी अर्थात “संकल्प ” Resoluations “,या बद्दल मित्रांन्शी शेअर करण्याची उत्सुकता असते.
हे सर्व फेसबुक आणि  इंटरनेट माध्यमावर वर मोठ्या आवडीने केली जाते . आपणही यात
फारसे मागे नाहीत “, हे शेअर करण्याकरिता या संकल्प-उपक्रमात “, सहभागी होण्याचे ठरवणे “, यात काहीच वावगे नाहीत .
” आपल्याला काही करावेसे वाटणे  आणि तशी इच्छा होणे ” ही भावनाच मुळी एक नवा उत्साह देणारी आहे , हे नव-चैतन्य आपल्या मनाला नक्कीच एक नवी उमेद देणारे असते.
यासाठी नव-वर्षातच नव्हेतर आगामी दिवसात,आणि  येत्या वर्षात “आपण काय काय करायचे  , ” ? हे जरूर ठरवावे , यातील जे सहजतेने आपण पूर्ण करू शकतो अशा सोप्या वाटणाऱ्या
गोष्टी सर्वात आधी करून टाकल्या तर “संकल्प-पूर्तीचा आनंद ” घेता येईल हे नक्की , यामुळे उत्साहात भर तर पडेलच पण “आपण काही करू शकतो “, हा विस्वास अधिक
बळकट होतो हे जास्त महत्वाचे आहे.
मित्रानो – गेल्या काही दिवसात माझ्या अनेक मित्रांनी  त्यांचे “नियोजित संकल्प “जाहीर केले, या सर्वांचे मन: पूर्वक कौतुक आहेच ,
आपण संकल्प करतो म्हणजे ,
गोष्टींचा आपण सतत विचार करीत असतो “, हे तर तुम्ही पण मान्य कराल ,
आणि ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्या सर्व गोष्टी-या आपल्याशी नक्कीच संबंधित असतात ,
त्या दृष्टीने आपण जे संकल्प करतो ते नक्कीच खूप महत्वाचे असतात, आपल्या दैनिक वेळापत्रकावर परिणाम करू शकणारे असतात . म्हणून संकल्प करीत असतांना आपण
एक काळजी घ्यावी ती म्हणजे ” आपल्याला जे करणे शक्य आहे, पूर्णत्वास नेऊ शकू अशा संकल्पास सिद्ध करावे.
माझा एक अनुभव -जो तुमचा सुद्धा असेल – तो म्हणजे –
आपणच आपल्या अनेक संकल्पांची .कल्पना ऐकून -लगेच चेष्टेचा सूर लावतो, टिंगल सुरु करतो ..अर्थातच यातील गांभीर्य मग निघून जाते . त्यात विशेष म्हणजे आपणच जर गंभीर
नसुत तर हे संकल्प-चर्चा ” निव्वळ हास्यापद उपक्रम ”  म्हणून चर्चिला जाऊन , यातून काहीच निष्पन्न होऊ शकत नाही. यासाठी –
गाजावाजा न करता ..आपण आपल्या मनाशी नक्की काही एक जरूर ठरवावे .
काय सुरु करायचे , काय  बंद करायचे .?. मग विषय सोपा असो, कठीण असो , आपली परीक्षा पहाणारा असो ,
प्रामाणिकपणे इच्छित संकल्प पूर्ण होण्यासाठी कृतीचा -आरंभ करावा ,
आपल्या कृतीतूनच आपल्यात होऊ लागलेला बदल सर्वांना जाणवू लागतो , मग, त्यावर होणारी  जाहीर वाच्यता किंवा हास्यापद चर्चा आपण टाळू शकतो ,
 म्हणून अगोदर कृतीतून संकल्प सिध्द  करून दाखवणे “,हे केंव्हाही परिणाम करणारे असेल.
संकल्प करणे , ते जाहीर करणे ,हा एक लोकप्रिय असा वार्षिक उपक्रम आहे , यात सहभागी होण्यास सर्वांना आवडते , या संकल्प मोहिमेत – वर्षानु वर्षे परिचित असलेले संकल्प-
असतात  जसे –
सकाळी -फिरायला जाणे,व्यायाम करणे , योगा करणे , वजन नियंत्रणात आणणे ,साखर सोडणे , चहा कमी करणे , जेवणाच्या वेळा पाळणे “,इत्यादी इत्यादी ..
वरील सर्व विषय अतिशय महत्वाचे आहेत , म्हणजेच ते थेट आपल्याशी – वैयक्तिक  संबंधित आहेत ..याबद्दल तर आपण जागरूकपणाने -काळजी घेत वागायलाच पाहिजे
,आणि आपल्या डॉक्टरांनी आपणास
वेळोवेळी केलेल्या सुचना आपण पाळल्या पाहिजे ..मग, या साठी “संकल्प -करून ” बोलून दाखवण्याची गरजच नाही ,उलट न सांगता हे कृतीतून दिसले पाहिजे ,
या साठी एक मोठा आणि महत्वाचा संकल्प नक्कीच करू या – तो म्हणजे – डॉक्टरांनी केलेल्या सुचानाची काटेकोर पणाने अमलबजावणी करायची “,
या संक्ल्पनाने आपली स्वतःची काळजी तर नक्कीच कमी होईल ,त्याच बरोबर ..परिवारचे टेन्शन कमी होईल “, हे जास्त महत्वाचे आहे.
संकल्प प्रत्येकाने जरूर करावे , यामुळे आपली निश्चयी -वृत्ती वाढेल , निर्णय -क्षमता वाढण्यास मदत होईल , आणि आवडीच्या विषयांचे संकल्प असतील तर संकल्प-पूर्ती साठी
आपल्या कडून  मनापासून प्रयत्न केले जातील .
माझा संकल्प जरूर तुमच्याशी शेअर करीन –
लेखनाच्या माध्यमातून “चांगले ते ते- प्रियजनाशी सांगेन ” असा माझा लेखन प्रयत्न असेन यासाठी तुमच्या प्रतिसादाची , अभिप्रायाची सोबत असू द्यावी.
शेष शुभ….
नव-वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
स्नेहांकित –
अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो- 9850177342
——————————————————————————————
(पूर्व-प्रकाशित – दै.सत्य -सह्याद्री -सातारा .रविवार-साहित्य -पुरवणी .दि.३०-१२-२०१८ )
लेख- संकल्प आणि कृती
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-9850177342

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..