भातुकलीच्या डावांत मांडला, संसार राजा राणीचा,—
इवल्याशा घरात चालला,
सांसारिक प्रवास त्यांचा,–!!!
छोटी छोटी भांडी कुंडी,
छोटे छोटे सामान,
इवली इवली सामुग्री,
करत सुख-रसपान, –!!!
हळूहळू संसार वाढला,
आले सोनुले बाळ,
कळले नाही कधीच,
किती निघून गेला काळ,—!!!
राजाराणी मग्न आपुल्या,
छोट्या चिमुकल्या विश्वात,
बाळ बालीश,वाढे निरंतर,
त्याला तारुण्य आले झोंकात,-!!
नादातच तो आपल्या राही,
वाहन वेगात चालवे,
करता करता पंचविशी,
गाठली बघा बाळाने,–!!!
बाळ कसले तरुण आता,
कर्ता पुरुष होतकरू,
आई-बाबा थकून जाती,
न ऐके त्यांचे लेकरू,–!!!
एक दिवस आक्रीत घडले, नियतीने तोंड फिरविले,
जाताजाता बघता-बघता, वाघिणीने कोकरू नेले,–!!!!
आईबापांचे जग कोसळले,
सारे विश्व उद्ध्वस्त झाले,
कोणते बाळ, कसला संसार,?
सारे सारे वाऱ्यावर गेले–!!!
भातुकलीचा डाव उधळे,
प्राक्तन त्याचे नाव,
आई बापाला पोरके केले,
बुडली संसाराची नाव,–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply