भरवशाची घेऊन शिदोरी, पाऊलवाट चालत होता ।
कुणीतरी आहे मार्गदर्शक, यापरी अजाण होता ।। १
बरसत होती दया त्याची, जात असता एक मार्गानी ।
आत्मविश्वास डळमळला, बघूनी वाटेमधल्या अडचणी ।। २
संशय घेता त्याचे वरती, राग येई त्याच कारणें ।
विश्वासाला बसतां धक्का, आवडेल कसे त्यास राहणे ।। ३
ओढून घेई मृत्युचि आपला, अकारण तो त्यास दुराऊनी ।
जागृत होता पुनरपि विश्वास, संशय जाई दूर पळूनी ।। ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply