नवीन लेखन...

संस्कार

संस्कार एक असा शब्द जो आजच्या काळात फक्त पुस्तकात वाचला जातो किंवा जुन्या पिढीतील कोणा जेष्ठ नागरीकाचे तोंडून ऐकला जातो. संस्कार म्हणजे नक्की काय याचे ऊत्तर व्यक्ती सापेक्ष असू शकते. एखाद्या व्यक्तीला जो अर्थ योग्य वाटेल तसा तो अन्य व्यक्तीला वाटेलच असे नाही.

ढोबळ मानाने संस्कार याचा अर्थ समाजामधे वावरताना कोणाही व्यक्तीने कसे वागणे योग्य होईल या बाबत जे सर्वसाधारण जे नियम पाळणे अभिप्रेत असते त्याला आपण संस्कार असे संबोधु शकतो. संस्कार हे नेहमी लहानपणी होणे महत्वाचे आहे. लहान वयात घरातील वडीलधारी व्यक्ती जे संस्कार आपल्या मुलांवर करतात ते कायम स्वरुपी मनावर कोरले जातात व ते लहान मुल जेव्हा मोठेपणी एक जबाबदार नागरिक म्हणूनसमाजात वावरते तेव्हा त्याचे कडून त्या संस्काराचेपालन होत असल्याचे आपणास दिसून येते.

संस्कार या विषयी विचार करताना आपणास सुसंस्कार हेच अभिप्रेत असते. आता सुसंस्कार म्हणजे तरी काय तर समाजात वावरताना कशा प्रकारे वर्तन असावे याबाबत समाजमान्य अशा रुढी वा चाली रितींचे पालन करणे बाबतचे अलिखीत नियम. या बाबत धार्मिक द्रुष्टीने विचार केला तरी प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथात प्रत्येक व्यक्तीने कशाप्रकारे आचरण असावे याबाबत मार्गदर्शन केलेले असते. व त्यानुसार आचरण करणे अपेक्षितअसते.सुसंस्कार या विषयी विचार करता सर्व जरी धार्मीक बाबतीत मत भिन्नता असली तरी सुसंस्कार या बाबत एकमत असल्याचे आढळून येते.लहान व्यक्तींनी मोठ्या व्यक्तींचा मान ठेवावा. घरात एकमेकांशी भांडण करु नये व शांतता राखावी. आपले घर व परीसर स्वच्छ ठेवावा. कुटुंबातील सर्व लोकांनी एकोप्याने रहावे व एकमेकांना अडचणीत असताना मदत करावी. हे सर्वसामान्य नियम सर्वत्र लागू होतात.

समाजात वावरताना कशा प्रकारे वर्तन असावे या बाबतही काही समाजमान्य नियम असतात व त्याचे सर्वांनी पालन करणे अपेक्षित असते. व येथेच त्या व्यक्तीचे संस्कार दिसून येतात. गोष्टी अगदी सामान्य असतात ज्या ती व्यक्ती किती सुसंस्कारीत आहे हे दाखवून देतात. कोणत्याही कार्यालयात आपण कामासाठी जातात शक्यतो पुर्वपरवानगी घेतलेली असावी. जर त्या व्यक्तीचे अन्य कोणाशी संभाषण चालू असेल तर थोडा वेळ शांत बसावे व नंतर आपला विषय माडावा. तसेच कोणा बद्दल काही तक्रार करायची असल्यास ती स्वच्छ शब्दात पण त्या व्यक्ती बद्दल अपशबद न वापरता करावी. सुसंस्कृत व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती कधी स्वतःचे गुणगान करत नाही. त्या व्यक्तीच्या अशा वर्तनातूनच व्यक्तीचे संस्कार दिसून येतात.

काही वेळा सुसंस्कृत व सुशिक्षित या बाबतीत गल्लत केली जाते. एखादी व्यक्ती सुशिक्षित असली म्हणजे ती सुसंस्कृत आहे असे समजणे चुकीचे होईल. ह्या दोन्हीही बाबी भिन्न आहेत. कोणत्याही व्यक्तीचा सुसंस्कृतपणा त्या व्यक्तीचे शिक्षणावर अवलंबून नसतो तर त्याचेवर कशा प्रकारे संस्कार झालेत व त्याची झडण घडण कशी झाली यावर अवलंबून आहे.

अशा सुसंस्कारीत व्यक्ती समाजात असणे ही सुद्रुढ समाज व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. व सुसंस्कारीत समाजच एक सम्रुध्ध व सुद्रुढ देश निर्माण करु शकतो व देशाचे भवितव्य ऊज्वल करु शकतो.

सुरेश काळे
सातारा
१३ मार्च २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..