नवीन लेखन...

संत ज्ञानेश्वर आणि ‘व्यवस्थापन’

– डॉ. मंगेश कश्यप यांच्या संत ज्ञानेश्वर या पुस्तकाला डॉ. विजय भटकर यांनी लिहिलेली प्रस्तावना.. 

अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी मूल्याधिष्ठीत, ज्ञानाधिष्ठित विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या दोन्ही आयामांच्या मध्ये ज्याचा समावेश होतो, नव्हे ती गोष्ट तिथे असलीच पाहिजे, ती म्हणजे ‘व्यवस्थापन’!

व्यवस्थापन म्हणा किंवा सर्वसाधारण प्रचलीत शब्द ‘मॅनेजमेंट’ म्हणा, यात अनेक बाबींचा समावेश होतो. सेल्फ डिसील्पीन म्हणजेच स्वयंशिस्त हा व्यवस्थापन-शास्त्राचा मूळ पाया आहे आणि या पायावरच पुढची व्यवस्थापनशास्त्राच्या माध्यमातून ‘यशाची इमारत’ उभी राहणार आहे. म्हणून ज्यांना यशरूपी मोक्ष-आनंद प्राप्त करायचा आहे, त्यांना या व्यवस्थापनशास्त्राची कास धरल्याशिवाय पर्याय नाही. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचे, विज्ञानाचे, नव्या नव्या शोधांचे प्राथमिक स्वरुपातील दाखले हे आपल्या प्राचीन, प्रचलीत संत साहित्यात सापडतात आणि म्हणूनच मला नेहमी वाटते की, अध्यात्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, मग ते अध्यात्माचं क्षेत्र असो वा विज्ञान तंत्रज्ञानाचं अथवा इतर अन्य कोणतंही क्षेत्र असो, त्या त्या क्षेत्रात योग्य व्यवस्थापन असेल तरच यशप्राप्ती होते. भारतामध्ये चार दशकांपूर्वी व्यवस्थापनशास्त्राविषयी कुतूहल निर्माण झाले आणि बघता बघता या व्यवस्थापनशास्त्राची कास धरून अनेक व्यक्ती, औद्योगिक समूह यशाच्या टप्प्यावर पोहचले आणि स्थिर झाले. मला स्वत:ला या व्यवस्थापनशास्त्राची पाळेमुळे ही संत साहित्यातच सापडतात. म्हणूनच ‘व्यवस्थापनतज्ज्ञ संत ज्ञानेश्वर’ हे पुस्तक वेगळ्या धाटणीचे ठरते. संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ मध्ये कृष्ण-अर्जुनाच्या संवादाचे विश्लेषण करताना अनेक दृष्टिकोनातून, रुपकांतून, विविध दाखल्यांमधून व्यवस्थापनाचीच सूत्र सांगितली आहेत, प्रश्न फक्त आपण त्या ग्रंथांकडे या दृष्टिकोनातून पाहतो का? असा आहे. माझे पत्रकार चार मित्र मंगेश कश्यप यांना व्यवस्थापनाच्या दृष्टीने योग्य, पूरक, पोषक असं सारं त्यांना सापडलं ते ते त्यांनी पुस्तकरुपानं आपल्यापुढे ठेवलं आहे. या पुस्तकामधे नेतृत्व विकास, व्यवस्थापनातील, कर्मातील नीतिमत्ता, गुणवत्ता व्यवस्थापन, कौशल्य हातोटी, मनुष्यबळ, कम्युनिकेशन म्हणजे संवाद शास्त्र इत्यादी अनेक बाबींचा परामर्श घेण्यात आला आहे. मुळातच मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं समाजमानसशास्त्र व त्याचे व्यवस्थापन, विज्ञान, तंत्रज्ञानासारखे विविध आयाम आपल्याला आपल्याकडील समृद्ध संत साहित्यातच आढळतात. म्हणूनच मंगेश कश्यप यांनी केलेला ज्ञानेश्वरीतील व्यवस्थापनशास्त्राचे प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. वाचक, विशेषत: मॅनेजमेंट या विषयाचे अभ्यासक, उद्योजक, विद्यार्थी यांचा या पुस्तकाला भरघोस प्रतिसाद लाभेल यात शंकाच नाही.

– डॉ. मंगेश कश्यप यांच्या संत ज्ञानेश्वर या पुस्तकाला डॉ. विजय भटकर यांनी लिहिलेली प्रस्तावना.. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..