नवीन लेखन...

संतप्त शहर

अशीच होरपळ झाली तर शहराची शिस्त किती दिवस टिकेल? साठणारा संताप मग रेल्वेच्या मालमत्तेपुरता सिमित राहणार नाही. त्या संतापाचा वणवा इतका वाढेल, की त्यात काहीच शिल्लक राहणार नाही. रेल्वेची मालमत्ता नष्ट करण्यामुळे प्रवाशांचेच अधिक हाल होतात, हे शहाणपण पुढारी मंडळी शिकवू शकतात


         मुंबईकर तसा शिस्तप्रिय माणूस. स्वत: शिस्तीत वगणार, बाहेरुन आलेल्या माणसालाही शिस्त लावणार, बाहेरुन आलेला माणूस इथल्या शिस्तीत कसा रुळला जातो, ते त्या माणसालाही समजत नाही. बघता बघता तो इथल्या नियमांना आपलासा करतो.

मुंबईच्या जीवनात किती शिस्त आणि किती सहनशीलता आहे, हे बाहेर गेल्याशिवाय कळणार नाही. प्रशस्त रस्ते, एैसपैस घर, बगिचे असलेले राजधानीच शहर घ्या किंवा कलकत्ता , मद्रास, बंगलोर, लखनौसारखी मुंबईच्या मानाने कमी वस्ती असलेली शहर घ्या. तिथल्या रस्त्यावर जाऊन उभ राहिल, की मग मुंबईची अवाढव्य वाहतूक व्यवस्था किती व्यवस्थित आहे हे लक्षात येते. वाहतूक व्यवस्थेच्या क्षमतेपेक्षा किती पटीने जास्त ताण ही सहन करु शकते, याच कारण लोकांच सहकार्य, एकमेकाला सांभाळून घेण्याची प्रवृत्ती.

पण सहनशीलतेलाही मर्यादा असतात आणि त्या मर्यादा एकदा ओलांडल्या, की त्याचा उद्रेक होण्यास अजिबात वेळ लागत नाही.

जातीय दंगली, भीषण बॉम्बस्फोट आणि प्लेगची भयावह शक्यता या आपत्तींमधून शहर कसबस बाहेर पडत असतानाच उपनगरी रेल्वे व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली. लोकांचा संताप अनावर झाला आणि त्याचा स्फोट होऊन फ्लाईंग राणी, लोकलचे डबे पेटवण, रेल्वे स्टेशनवरच्या मिळेल त्या सामानाची मोडतोड करण, पोलिस गोळीबार असे प्रकार घडले.

शांतताप्रिय मुंबईकराला झाल तरी काय, असा प्रश्न दिल्लीपासून मुंबईतल्या राजकीय  पुढा-यांपर्यंत प्रत्येकाला पडला. वातानुकूलित गाडीतून शहरभर फिरणाऱ्या आणि नरिमन पॉइंट ते एअरपोर्ट इतकाच प्रवास करणाऱ्याना शहरातील कष्टकरी लोक दिवसाचे चार तास उभ राहून कसा जीवघेणा प्रवास रोज करतात, ते कळणार कस.

गेल वर्ष-दीड वर्ष पश्चिम आणि मध्य रेल्वेची उपनगरी वाहतूक पूर्णपणे कोलमडली, पण कुणालाच त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. लोक सहनशील आहेत, पण किती? वीज पुरवठा बंद झाला. अपघात झाला, वायर तुटली ही कारण समजू शकतात. लोक शांतपणे वाहतूक पूर्व स्थितीवर यायची वाट बघतात. पण काहीच कारण नसताना केवळ गलथानपणामुळे रोजचीच रड झाल्यावर संताप येणारच. मग तो साठत गेला आणि त्याचा स्फोट झाला.

कुणी म्हणाल, आमची ही जबाबदारी नाही. राज्य सरकार केंद्र सरकारकडे, तर केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवत, कुणाला याच्यामागे गुंडांचा हात दिसतो. तरी कुणाला येणारी निवडूक कारणीभूत वाटते. कुणी लोकांना दोष देतो, कुणी रेल्वेला. मग उच्च पातळीवरच्य बैठका होतात. आश्वासन दिली जातात आणि विसरली जातात. उपनगरी रेल्वे आपल्या कंटाळवाण्या बेभरवशाच्या चालीन चालत राहते.

निर्णर्य घेणारे समाजातले राजकारणी नेते, उद्योग धंदा भरभराटीस आणणारे सामान्य लोक मात्र दूरदूरच्या उपनगरात राहतात आणि त्यांचे जर असे हाल झाले, अशीच होरपळ झाली तर शहराची शिस्त किती दिवस टिकेल? साठणारा संताप मग रेल्वेच्या मालमत्तेपुरता सिमित राहणार नाही. त्या संतापाचा वणवा इतका वाढेल, की त्यात काहीच शिल्लक राहणार नाही. रेल्वेची मालमत्ता नष्ट करण्यामुळे प्रवाशांचेच अधिक हाल होतात, हे शहाणपण पुढारी मंडळी शिकवू शकतात, पण ते समजण्याइतकी सहनशीलता राहणार नाही. संतापाचा भडका उडेल हे या संतप्त शहराच्या रखवालदाराना समजायला हवे.

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक २० ऑक्टोबर १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..