संतुलित आहार : काळाची गरज
कोणत्याही माणसाची आयुष्यात माफक अपेक्षा असते कि, माझे जीवन सुखी, आनंदी असावे. मग सुखी जीवनासाठी निरोगी शरीर अतिमहत्वाचे ! महात्मा गांधीजीनी म्हटले कि शरिर हे साधन आहे, त्याची काळजी प्रत्येकाने ठेवावी . आपल्या शरीराचे इंधन मंजे अन्न म्हणजे आहार तीही संतुलित .
याबाबत भगवद्गीतेत ६व्या अध्यायात १७ व्या श्लोकात सांगितले कि..
युक्तःराविहारस्य युक्ताचेष्टस्य कर्मसु
युक्तास्वनावाबोधास्य योगो भवती दुखः
म्हणजे श्रीकृष्णानी अर्जुनाला असा उपदेश केला कि, ज्याचा आहार संतुलित आणि आचार ,विचार उत्तम आहे वेळेवर झोपणे ,उठणे क्रिया आहेत.अशा व्यक्ती च्या जीवनात दुखाचा शेवट होतो. यावरून लक्षात येते कि सत्त्व युगापासून ते कलीयुगापर्यंत संतुलित आहार महत्त्व टिकून आहे .
‘ बदल हा निसर्गाचा नियम आहे ‘ त्याप्रमाणे आहाराच्या पद्धती , सवयी बदलत आहे या बदलाची डोळे झाकून अवलंबन केल्याने शरीराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याचे मूळ कारण आधुनिकतेने दिलेले फास्ट फूड व प्रोसेस्ड फूड ! या पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात सर्वजण रोज किंवा समारंभाच्या निमित्ताने करतो. यात वडापाव, सामोसा ,पिझ्झा , बर्गर, पाणीपुरी ,ई. पदार्थ येतात. फास्ट फूड व प्रोसेस्ड फूड यामध्ये अधिक प्रमाणात फट ,शुगर असते .हे पदार्थ मैदा,मसाले यांचे असल्याने पौष्टीकता कमी असते . लहान मुलांना दिले जाणारे मगी ,चोकलेट, बोर्नविटा, व काही बिस्किटात कृत्रिम रंग, अजीनोमोटो, पेस्टीसाईड ,असल्याने खाण्यास हानिकारक तसेच वजन वाढवतात . यातील शुगरने अमली पदार्थाप्रमाणे मेंदूवर व भुकेवर परिणाम होतो . जंक फूड च्या सोबतीला सोफ्ट ड्रिंक सरसपणे घेतले जाते
य पेयामुळे सहरीरातील असिड कमी होऊन अल्सर होते . शीत पेयाचे अति प्रमाणात सेवन केल्याने मृत्यु झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील यावरून शीत पेयाची तीव्रता आपल्या शरीरास योग्य नाही . म्हूणन अश्या जंक फूडचे सेवन १ ते २ महिन्यातून एखादे वेळेस करावे . य पदार्थातून एनर्जी पटकन मिळते पण पोषकतत्व नाही.उलट कान्सेर , अल्सर सारखे दुर्धर आजार होतात. याला सर्वोत्तम उपाय म्हणजे संतुलित आहार होय .
संतुलित आहारात आपल्या रोजच्या जेवणात किमान पुढील पदार्थ असावेत अगदी गरीबही संतुलित जेवण घेऊ शकतो त्यासाठी श्रीमंतच असावे असे काही नाही .पोळी ,भात, वरण, लोणचे, चटणी ,आमटी असली कि पदार्थाचे सगळे घटक येतात जसे पिष्टमय, प्रथिन, स्निग्ध, खनिजे व जीवनसत्त्व होय . आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे शरीरातील आजार दूर करण्यासाठी जेवण/ आहार हाच उत्तम औषध आहे. य आहारात तृणधान्ये ,कडधान्ये ,फळे , भाज्या ,दुध व दुधाचे पदार्थ ,मीठ व पाणी हे घटक चौरस म्हणजे संतुलित आहार करतात . आहाराचे प्रमाण स्त्री ,पुरुष , मुले याप्रमाणे बदलते तसेच काम करण्याच्या पद्धती वरून कष्टकरी, बसून कामे असल्यास आहार कमी जास्त होतो .वयोमानाप्रमाणे हि आहाराचे प्रमाण ठरते .आहार अति प्रमाणात घेतल्यास आजार होतो. महावीरांनी विवेक दर्शन पुस्तकात म्हटले कि ,जिभेला आवडेल ते न खाता संयम ठेवून जेवल्यास विवेक होतो. तर अविवेकाने न जेवता ,अति प्रमाणत आहार खाऊ नये .तसेच अन्नाचा अपव्यय टाळावा. कारण ‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे’
आहार घेण्याआधी स्वयंपाक महत्त्वाचा आहे .कारण या कृतीत अन्नाची पोषकता टिकली तर संतुलित आहार मिळेल . भाज्या शिजविण्यापुर्वी व चिरण्यापुर्वी धुवावे. भाज्या शिजवलेले पाणी फेकू नये तर फोडणी दिल्यावर परत भाजीत टाकावे.फायबरयुक्त ,मिक्स भाज्या कराव्यात. ऋतुमानानुसार लाल , पिवळ्या ,हिरव्या फळे व भाज्या खाणे अति उत्तम .पालेभाज्या व फळभाज्या आहारात असाव्यात. कच्च्या फळभाज्या जसे गाजर ,कोबी ,काकडी खावी परंतु चिरल्यानंतर अधिक काळ ठेवू नये कारण पोषकता कमी होते.अंकुरित व मोड आलेले कडधान्ये खावे. पोटाचे विकार १ वाटी दही रोज एकदा खाल्यास दूर होतात .
आयुर्वेदात शरीराच्या तीन प्रवृत्ती सांगितल्या आहेत. वात, पित्त,कफ हे लक्षात घेवून आहार ठरवावा .
जेवणाचे पुढील ३ प्रकार होतात .
1. सत्त्व– तेलमय ,रसभर ,पौष्टीक
२.राजस- आंबट, खारट, गरम, सुखे ,भाजलेले पदार्थ
३.तामस- वाईट वास येणारे , अर्धवट भाजलेले व शिजलेले ,अशुद्ध, शिळे
यापैकी सात्त्विक जेवणाचे सेवन करावे. जेवताना मध्ये मध्ये पाणी म्हणजे अमृत ! होय .त्याने शरीराची मल पदार्थ बाहेर टाकण्यास / उत्सर्जित उपयुक्त होते . दोन जेवणाच्या दरम्यान ३ ते ६ तासाचे अंतर असावे. सकाळी जेवण ११ ते १ तर रात्रीचे जेवण ७ ते ९ य दरम्यान घ्यावे. आहारात पेय म्हणून लस्सी, फळांचे रस (कृत्रिम क्रीम नसलेले), गुनगुना पाणी, कैरीच पन्ह, बदाम शेक,लिंबू पाणी, मध व पाणी साखर व गुळ टाकून घ्यावे. सुका मेवा ,मसाल्याचे पदार्थ याचे योग्य प्रमाण घ्यावे. त्यासाठी सकाळचे जेवण राजाप्रमाणे पोटभर तर रात्रीचे जेवण भिकाऱ्याप्रमाणे कमी खावे .
महाराष्ट्र शासनाने मेळघाटातील आदिवासी भागात सर्वेक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले कि तेथील लोकांच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी आहे म्हणून जेवणात आंबट पदार्थ हवाच जसे कि लिंबू किंवा लोणचे, आमसूल इ. कारण प्रथिने व लोह शरीरातून कमी प्रमाणत रक्तात मिसळून जास्त प्रमाण मूत्रातून भर येते तेच जर सोबतीला सी विटामिन असल्यास लोहाचे प्रमाण वाढते. आयोडीनयुक्त मीठ याचे मार्गदर्शन शासनाने केल्याने माणसाच्या आहार्त मग शरीरात लोह वाढले.
प्रोटीन हा शरीरबांधणीचा महत्त्वाचा घटक आये .शरीर सुडौल दिसावे म्हणून प्रोटीन सप्लीमेंट सेवन करण्याचे प्रमाण वाढत आहे .परंतु प्रोटीन सप्लीमेंट सेवन करण्याचे बंद केल्यास शरीराची दुरवस्था होते.हे आपणाला WWF मधील स्पर्धकांचे खेळ सोडून दिल्यावर पाहिल्यास दिसून येते , जणू शरीर तंदूरूस्त न होता क्षय झालेला दिसतो. प्रोटीन सप्लीमेंट सेवन टाळावे.
संतुलित आहारासाठी डायट करणे टाळावे. बऱ्याच स्त्रिया, तरुण सुंदर व्यक्तिमत्त्वासाठी कमी आहार घेतात, परंतु फ्रान्स येथे मॉडेल यांचा आरोग्य तपासणी अंती असे लक्षात आले कि त्या सर्व कुपोषित आहेत . शरीराला सर्व अन्न घटक मिळणे गरजेचे आहे. डायट करणे हा योग्य मार्ग नव्हे !
जैसा खाए अन्न वैसा होय मन
या उक्तीप्रमाणे लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत खाण्याचा प्रमाण तसेच पोषकतेवरून शरीर मन दिसून येते . जर कुटुंबात कुणी आजारी असेल टर इतरांची शारीरिक ,मानसिक ,आर्थिक हेळसांड होते. आपल्या संस्कृतीत घरात अन्नपूर्णा माताची भूमिका प्रदान केली मतांनी आपल्या पूर्ण कुटुंबाला संतुलित /चौरस आहार मिळेल याची दक्षता घ्यावी.
बाहेर ,हॉटेल मध्ये ,विकत मिळणारे पदार्थाची पोषकता तपासणी व्हावी तसेच शुद्ध पाणी व आहार सेवन करतो याची काळजी घ्यावी कारण विषबाधा होण्याची शक्यता असते .
संतुलीत आहाराने सुदृढता मिळतेच व जीवन ध्येय गाठण्यास सहज शक्य होते तरच आपणाला निरोगी शरीर मिळेल व आपले राहणीमान दर्जा उंचावेल,सुखी ,आनंदी जीवन मिळेल .
— श्रीमती निता आरसुळे
neetaarsule@gmail.com
Leave a Reply