सांगा, सांगा कुठला देवधर्म आता
सांगा कुठले सत्य – असत्य आता..।।
कुणी सांगावे, ते ऐकावे
देवकृपे ते घडते सारे
डोळी दिसले तेच पाहिले
सांगा काय ज्ञात – अज्ञात आता….।
रामकृष्णही जन्मले जगती
देवत्वाची ती साक्ष जगती
निधर्माचेच ते रक्षणकर्ते
सांगा कुणी पाहिला देव तो त्राता….।
कुठली प्रीती, कुठली भक्ती
सुखसागरी मस्त धुंदित जगावे
श्वासात गंधतो स्वार्थभोग आता
सांगा निष्पाप स्पर्श हवा कुणा आता…।
सांत्वन मनीचे रोज करावे
कधीतरी भेटल तो नियंता
दमले नेत्र अन जीव हा सारा
सांगा कुठली मोक्षमुक्ती आता….।
–वि.ग.सातपुते.( भावकवी)
9766544908
रचना क्र.२०२
१६/८/२०२२
Leave a Reply