दुःखवेदनाच ! सखी खरी ।
आठवांतुनी झुळझुळणारी ।
मुक्त हृदयांतरी बिलगणारी ।
सत्य ! स्वसांत्वनी दुःखहारी ।।१।।
दुःखाचे पावित्र्य ! आगळे ।
ते कां? सहचजी, उमगते ।
सुखदु:खाचे दान भाळीचे ।
भोग भोगणेच ! जन्मांतरी ।।२।।
अनाहत लाठी भगवंताची ।
ऋणानुबंधीच साऱ्या गाठी ।
तोच जोडितो,तोच तोडितो ।
जपुया ! सत्कर्माची शिदोरी ।।३।।
जन्मा ! येताजाता बंद मुठी
सत्ता ! सारी त्या दयाघनाची
क्षणाक्षणाला तो एक सावरी
सत्कर्माचीच साक्ष सरणावरी ।।४।।
मनामना नित्य सावरीत जावे
सुखदा ! ती निर्मळ भावप्रीती
आत्मानंदी क्षण ते कृतार्थतेचे
कृपाळू भाग्य भाळीचेच ईश्वरी ।।५।।
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३८
२६ – १० – २०२१.
Leave a Reply