कधी तरी एक शब्दतरी
बोलत जावे असे वाटते
कधी तरी सहज एकदा
हसले जरी तरी बरे वाटते
न धरावी अबोलता सदा
मनास खूप वाईट वाटते
संवादाविना कसले जीवन
मन मोकळे बोलावे वाटते
शब्दमनभावनांची गुंफण
मनांतरा सांधते असे वाटते
शब्द लाघवी ,आनंद स्पर्शी
सहज जीवा जगवितो वाटते
कधी तरी एक शब्दतरी
बोलत रहावे असे वाटते
– ©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908.
रचना क्र. ८८.
३० – ६ – २०२१.
Leave a Reply