वाहतो पवन बेभान धुंदला
उधळीत गंध शब्दभावनांचे
गडगडता अंबरी कृष्णमेघनां
प्रीतगान, मृदगंघले वसुंधरेचे
ओढ अधीर, अवीट मधुरम
संथ झुळझुळणे ते निर्झराचे
मन ओले, ओले चिंब चिंबले
साक्षात्कार प्रसन्न वर्षाऋतुचे
स्वर, पावरीचे श्रावण श्रावण
सप्तरंगलेले, इंद्रधनु अंतरीचे
हे स्वानंदाचे सात्विक सोहळे
संगीत जणु, कृतार्थ जीवनाचे
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२६
५/९/२०२२
Leave a Reply