कळते आहे सारेच मजला
वाच्यतेस मात्र बंदीच आहे
मूक गिळुनी सारेच पहावे
अंगवळणी पडलेलेच आहे
जे जे घडते ते घडूनी द्यावे
डोळेच झाकुनी घेणे आहे
कोण तुम्हास इथे विचारतो
ही इथली नग्न सत्यता आहे
न पाजावे ते दोष उपदेशाचे
सर्वांनाच स्वातंत्र्य हवे आहे
कसली संस्कारी नीतीमूल्ये
आज ते सारेच थोतांड आहे
आता जगावेही स्वतःपुरतेच
सांगा तुमची कुणा गरज आहे
जन्मतः सारेच सर्वज्ञ , समर्थ
कलियुगाचीच ही साक्ष आहे.
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८३.
१६ – ३ – २०२२.
Leave a Reply