त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या मराठी कुटुंबात जन्मलेली चित्रपट-अभिनेत्री सारिका ठाकूर माहेरचे नाव सारिका ठाकूर. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९६० रोजी झाला. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या जोडीच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले.
यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. सारिका यांना दोन वेळा नॅशनल अवार्ड पण मिळाले आहेत. लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिका यांनी १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले.
35 वर्षां पुर्वी फ़िल्मफ़ेअर मासिकात एक आर्टिकल आले होते” Those who speaks with their eyes” या आर्टिकल मधे तिच्या डोळ्यांचे वर्णन ” एका छोट्या मांजरी सारखे दिसतात असे केले होते आणि बिंदुचे डोळे एखाद्या बोक्या सारखे दिसतात असे केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply