सरोजिनी शंकर वैद्य यांचा जन्म १५ जून १९३३ पुणे येथे झाला.
सरोजिनी वैद्य या ललित लेखिका, चरित्रकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होत्या. पुण्यातील हुजूरपागा शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक म्हणून त्यांनी योगदान दिलं होतं. सरोजिनी वैद्य या ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांच्या पत्नी. आज शंकर वैद्य यांचाही जन्मदिन असतो.
आठवणी काळाच्या माणसांच्या, कहाणी लंडनच्या आजीबाईंची, पहाटगाणी, शेजवलकर: व्यक्तित्व आणि कर्तृत्व, संक्रमण, माती आणि मूर्ती, रमाबाई रानडे: व्यक्ती आणि कार्य, नानासाहेब फाटक: व्यक्ती आणि कला, समग्र दिवाकर, वासुदेव बळवंत पटवर्धन: जीवन आणि लेखन, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
सरोजिनी वैद्य यांचे ३ ऑगस्ट २००७ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply