सन १९९८ मधला श्रावण महिना…नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत….
ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर तर थोड्याच वेळात पडणारे उन व साथीला पडणारे इंद्रधनू असे विलोभणीय दृश्य असते..
गावात अनेक ठिकाणी ग्रंथ.पोथ्या- पुराणांचे पारायण असायचे.सोमवार,गुरूवार,शनिवार उपवास..असायचा.
त्या दिवशी सोमवार होता..मी आँफिसमधून नुकताच घरी येऊन हातपाय धुऊन बसलो होतो.दिवसभर उपवास असल्यामुळे कधी एकदा जेवण करतो असे झाले होते..
आणिअचानक आमच्या घरी गावातील श्री.गणपत मोहन आले.आणि म्हणाले..कपडे घालुन तयार व्हा..दामू मोहन यांच्या बायकोला सर्पदंश झाला आहे.ताबडतोब चला…दामू मोहन व त्यांचे कुटुंब म्हणजे गावातीलआदर्श कुटुंब..सर्वाबरोबर मिळुनमिसळून राहणारे कुटुंब..विशेष म्हणजे आमच्या वडीलांचे दामू मोहन हेअत्यंत
जवळचे मित्र …
सर्पदंश म्हटल्याबरोबर कपडे घातले व जेवण न करताच लगेचच मोटार सायकल घेऊन श्री,गणपत मोहन यांना घेऊन त्यांच्या घरी निघालो.
तेथे संपुर्ण गावातील व वाड्या वस्त्यांतील खुप लोक जमा झालेले..
दामू मोहन यांची पत्नी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत झोपलेली..खुप लोकांचे म्हणने असे की तीला डाँक्टर कडे घेऊन न जाता गोट्या कातक-याकडे न्या.तो औषध देईल..तेथे देवीची भक्तीन पण आहे.ती काहीतरी अंगारा देईल…मी म्हणालो..आपण डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊया..परंतू खुप लोकांनी विरोध केला..त्यांचे म्हणने असे की दवाखान्यात डाँक्टर नसतात.औषधे नसतात.डेहणे थोडे लांब आहे…विष शरीरात भिनत चालले आहे..तीथ पर्यत पेशंट जगला पाहिजे….त्यापेक्षा विठ्ठलवाडी हे अंतर जवळ आहे..
लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यापेक्षा पेशंटला उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे होते..मी माझ्या मोटारसायकलवर मी, संर्पदंश झालेल्या काकू,माझा चुलत भाऊ मारुती धर्मा तळपे व गावातील समाजसेवेची आवड असनारे व गावच्या धार्मिक कार्यात भाग घेणारे श्री.कमाजी (म्हतारबा) हुरसाळे असे चौघे निघालो.शिरगावला आल्यावर डेहण्याला जायचे की विठ्ठलवाडीला असा संभ्रम पडला..मारुती म्हणाला विठ्ठलवाडी तर कमाजी म्हणाला डेहणे..शेवटी मी डेहण्याकडे गाडी वळवली….
धुओली गावाजवळ गेल्यावर काकुंनी मान टाकली..नाडीचे ठोके थांबले…मारुती म्हणाला..गाडी मागे वळव…पेशंट संपला…माझ्या हृदयात चर्रर्र झाले…गावातील लोक आता आपल्याला खुप बोलतील व पेशंट गेल्याचा बधूपणा आपल्यावर येईल.याचे शल्य टोचत राहणार.असा विचार येऊन गेला विचाराच्या.तंद्रीत.तशीच गाडी घेऊन रात्री ८.३० वा. डेहणे गाठले..दवाखान्यात गेलो तर तेथे कुनीच नव्हते…त्यातच लाईट गेलेली..त्यामुळे अजुनच अस्वस्थ वाटू लागले.नको ते विचार मनात येऊ लागले.आणि अशातच एका स्रीचा आंधारातुन आवाज ऐकू आला..कोण आहे..?..बहुदा त्या रात्रपाळीच्या नर्स असाव्यात…
या बाईला सर्पदंश झालाय…
डाँक्टर आहेत का? मी विचारले..
हो आहेत…
थांबा मी बोलावते..
असे म्हणून नर्सबाई गेल्या.व लगेचच डाँक्टर व नर्सबाई भलीमोठी इमर्जन्सी ट्युब (विजेरी) घेऊन आल्या..
पेशंटला काँटवर झोपवण्यात आले.
डाँक्टरांनी काकूंना तपासले..तपासुन झाल्यावर डाँक्टर बोलले.पेशंट जगण्याची फक्त ५% खात्री आहे.खुप उशिर झाला आहे,. तरीही मी प्रयत्न करतो.बघुया..
तेवढ्यात कमाजीने प्लँस्टिक पिशवी डाँक्टरांकडे दिली.त्यामध्ये काकूंनी मारलेला साप होता..
डाँक्टरांनी साप निरखून पाहिला.व बोलले.Good,आता आपल्याला उपचार करणे खुप सोपे झाले..
तात्काळ काकूंना सलाइन लावण्यात आले.व त्यामध्ये इंजेक्शन भरले.सलाइन.संपल्यावर पुन्हा दुसरे..अशा प्रकारे तीन-चार सलाईन लावली.तो पर्यंत गावातील खुप लोक आले होते.व वेगवेगळ्या चर्चा करत होते..थोड्याच वेळात काकुंनी डोळे उघडले..सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.नववे सलाईन व औषध संपल्यावर काकू बोलू लागल्या..
त्यानंतर मला भुकेची तीव्र जाणीव झाली..तो पर्यंत उपवास असुनही भुकेची साधी आठवणही आली नाही हे विशेष..।
— श्री.रामदास तळपे (मंदोशी ) ता.खेड जि.पुणे
Leave a Reply