नवीन लेखन...

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील सामाजिक, जीवोद्धारक तथा आध्यात्मिक क्रांतीचे आद्यजनक भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म शके १११६
(इ.स. ११९४)ला बाराव्या शतकात गुजरात राज्यातील नर्मदेच्या काठी असलेल्या भडोच येथे झाला. त्यांच्या
वडिलाचे नाव विशालदेव, आई माल्हेणीदेवी
यांच्या पदरी पुत्ररत्न झाल्याने भडोचनगरीत गुड्या,
तोरणे उभारण्यात आली होती, वाजंत्रीचा गजर करण्यात आला होता, घरोघरी पेढे, मिठाई वाटण्यात आली होती.बारा दिवस एकसारखा हा सोहळा सुरू राहिला.
श्री चक्रधर स्वामींच्या अवतारकार्याचा परिचय करून
घेताना इतिहासाची ज्ञात-अज्ञात पाने उलटून १२ व्या शतकात प्रवेश करावा लागतो आणि तत्कालीन धार्मिक, सामाजिक तथा राजकीय परिस्थितीचे अवलोकन करावे लागते. शके ११२२ ते १२३२ (म्हणजेच इ.स. १२०० ते १३००) देवगिरीवरून
राज्यकारभार करणा-या व महाराष्ट्रावर तथा मराठी संस्कृतीवर अभूतपूर्व ठसा उमटविणा-या यादवांचा हा काळ आहे. सिंगणदेव कृष्णदेव, महादेव व रामदेव
हे बलाढ्य यादव सम्राट या काळात होऊन गेले. यादव राजांनी आपल्या पराक्रमाने महाराष्ट्राच्या चतुःसीमा दक्षिणेत तुंगभद्रा, पूर्वेस वैनगंगा, उत्तरेस नर्मदा व पश्चिमेस सिंधुसागरापर्यंत पसरविल्या होत्या. यादवराज्य अर्थातच एक विशाल राज्य होते. शासनव्यवस्थेत राजाचा शब्द अखेरचा मानला जात होता आणि त्यामुळे सम्राट जर धार्मिक व प्रजाहितदक्ष तरच शासन व्रजाच्या हिताचे होत असे. पण ‘लीळाचरित्राच्या काळात म्हणजेच स्वामींच्या
महाराष्ट्रातील वास्तव्यात देवगिरीच्या रामचंद्रदेव
यादवांच्या राज्यात सामाजिक सुखसमृद्धी
तथा विलासापभोगाची विविधता आणि विपुलता असली तरी सामाजिक अशांतता,वर्णविद्वेष, अज्ञान व
ज्ञानाचे अवडंबर वाढलेहोते.मुबलकधनसंपत्ती,
धर्मकर्माच्या नावावर ऐषोरामाचीवृत्ती,उच्चनीचतेची समाजविघातक प्रवृत्ती या सगळ्या गोष्टींमुळेच ऐहिक पारलौकिक सुखाभिलाषेने देवीदेवतांच्या पूजनात तत्कालीन उच्चभ्रू समाज रममान झाला. स्वकर्तव्य पराङ्मुख होऊन विकार जे विकल्पाच्या जाळ्यात अडकला होता. पण सामान्य जण मात्र ऐहिकच काय, पण पारलौकिक सुखालाही पारखा झाले होते. संपूर्ण समाजाचाच एकूण आध्यात्मिक स्तर खालावला होता. परमेश्वरी धर्माचा लोप होऊन मोक्षमार्गाची वाटचाल खंडित झालीस होती. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या जटिल बंधनात मानवसमाज बंधिस्त झाला होता. उच्चभ्रू वर्णात ऐहिक, पारलौकिक सुखाच्या लालसेने धर्मकर्माचे अवडंबर वाढले होते तर सामान्यजण अज्ञानांधकरात चाचपडत होता. स्त्री शूद्रांना तर धर्माचा तथा कर्माचाही अधिकारनव्हता. संस्कृत भाषा वेदोपनिषादी धर्मग्रंथ यांचा गंधही सामान्य जणांना नव्हता. तसा एखाद्या शूद्राने या धर्मग्रंथाच्या श्रवणाचा तथा पठणाचा प्रयत्न केलाच, तर त्याच्या कानात शिसे ओतण्याची, त्याची जीभ छाटण्याची, प्रसंगी देहदंडाचीसुद्धा शिक्षा देण्यात येई. अशा या थकल्या-भागल्या काळात स्वामींनी महाराष्ट्रात येऊन आपल्या क्रांतिकारी अवतार गुजरातमध्ये घेऊन स्वामींनी महाराष्ट्राला आपली धर्मभूमी मानली. दीनदलित-असहाय समाजाचे अवलोकन करून समतेच्या अधिष्ठानावर आधारित अशा नवमतांचे प्रतिपादन केले. आत्मकल्याणकारी परमेश्वरभक्तीचा ज्ञान व वैराग्याच्या आयामांचा पुरस्कार केला.समाजात रुंदावत जाणारी दरी समाप्त करणारया व एकात्मतेचे सगुह्यातिगुह्य तत्त्व प्रतिपादन करणाच्या सर्वसमावेशक अशा सत्य, सनातन महात्म धर्माचे प्रवर्तन केले. हजारो वर्षांपासून बंद असलेल्या मोक्षमुक्तीचा मार्ग,स्वातंत्र्याचे मर्म सांगून पुन्हा या सर्वांसाठी खुला केला. एक नवे विशाल मानवी मूल्य प्रस्थापित करून मृतप्राय झालेली जीवनमूल्ये जिवंत केली.स्वामींचे तत्त्वज्ञान, स्वामींनी सांगितलेला आचारधर्म हा या आजही समाजासाठी आवश्यक आहे. महाराष्ट्रात समाजसुधारणेची व चळवळ तथा समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी आजपर्यंत जे जे काही दृश्य-अदृश्य प्रयत्न झाले आहेत त्यांची मूळ प्रेरणा कोणती असेल तर ती म्हणजे श्री चक्रधर स्वामींचे अवतारकार्य होय.समाजाने शतकानुशतके ज्यांना आपल्या जवळही फिरकू दिले नाही अशा झाडी गोंड वाड्यातील आदिवासीबरोबरही स्वामी राहिले. त्यांच्या बांबूच्या कांड्यात शिजलेला भातही स्वामींनी अतिप्रीतीने स्वीकारला. जोगेश्वरीला असताना मातंगाची स्वामीना भेटण्याची तीव्र इच्छा होती. स्वामी मंदिराबाहेर येऊन भेटले.त्याने भेटीदाखल स्वामींना एक लाडू दिला. स्वामींनी त्यांचा हात धरून मंदिरात आणले व त्यांनी दिलेला तो लाडू स्वामींनी सर्व भक्तजनांत वाटला. विकार विकल्प शून्यतेचे धडे देऊन स्वामींनी एका समाजक्रांतीला जन्म दिला.दाळोबा नावाचा चांभार डोमेग्रामला स्वामींना एक पंचवर्णी जाडी लोकराची घोंगडी आणि एक चवरी स्वामींना अर्पण करतो.स्वामी ते सर्व साहित्य स्वीकारतात. एवढेच नाहीतर आपल्यासोबत त्याना पंक्तीत जेवायलादेखील बसवितात, हा पवित्र तो अपवित्र, हा शुद्ध तो अशुद्ध अशा प्रकृतिजन्य विचिकित्सारूप दिल्याची कल्पनाच स्वामींना अभिप्रेत नाही,
सालबर्डीच्या डोंगरात स्वामींच्या आश्रयाला आलेल्या
सशाची मागणी करणाया पारध्यांना स्वामी सांगतात, हा ससा तुमचा नाही. तुम्ही जीव प्राणी आहात तसा तोसुद्धा प्राणी आहे. असा उपदेश स्वामींनी करताच त्यांच्या मनातील दृष्ट भाव नष्ट होऊन त्यांनी स्वामींना क्षमा मागितली. नंतर सशाना स्वामीनी,”जा महात्मे हो” असे म्हणून, कुरवाळून त्याला जाऊ दिले. जीवमात्रांविषयी अपार करुणा स्वामींच्या अनेक लीळेत दिसून येते. अशा अनेक लीळेची माहिती आपल्याला ‘लीळाचरित्रा’च्या माध्यमातून मिळते. देवतांचे युगधर्मही स्वामींनी सांगितले.
देवतांची फळेही पत्नशील आहेत, तर परमेश्वरप्राप्ती हीच नित्यमुक्त करणारी आहे. म्हणून मोक्षाची इच्छा असेल तर मानवाने परमेश्वराची अनन्य उपासना करावी. जीव, देवता,प्रपंच व परमेश्वर या चार नित्यवस्तूंची सृष्टी आहे आणि परमेश्वराची प्राप्ती होणे हाच जिवाचा मोक्षमार्ग आहे. मानवी मूल्यांना नवसंजीवनी देण्यासाठी स्वामींची ओळख समाजाला
करून देणे अत्यावश्यक आहे.
लेखक:-
सुरज गुलाबराव वरघणे
लेखकाचे नाव :
सूरज गुलाबराव वरघणे
लेखकाचा ई-मेल :
sgwarghane@yahoo.com
Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..