नवीन लेखन...

सर्वसाधारण हॉटेलनीती

चौघांच कुटुंब हाँटेलमधे प्रवेश करताच आपल्या ओळखीच कोणी नाही न किंवा आहे का हे कनफर्म करत एसी किंवा फँनच्या टप्प्यात, खिडकीपासुन जवळ, कोपर्यातली जागा पटकवण्याचा प्रयत्न करते. कुटुंबाची इतरांकडे पाठ पण आपल्यासाठी टेहेळणी बुरुजावरुन हाँटेलमधील उपस्थित व प्रवेश द्वारातुन येणार्या जाणार्या सौंदर्य स्थळांची नोंद घेता येइल अशी बैठक कुटुंबप्रमुख आदर्श मानतो आणि साकारतो.

आजुबाजुचा सर्व्हे करुन आपल्या बरोबरच्यांवर स्टायलिश् हिंदी किंवा माॅडर्न, ब्रोकन, स्टॅमरिंग इंग्लिशचा मारा करत गप्पा, ज्योक ठोकण चालु होत. एक दोन सेल्फीही या वातावरणात अटळ असतात.

या नंतर दोघांचीही मातृभाषा मराठी असुनही आँर्डरसाठी वेटरकडुन हिंदीतुन मेनु कार्ड मागवल जात आणि वेटरच्या उपस्थितीत किंवा ” पाच मिनीट बाद” म्हणत मेनु कार्डचा अभ्यास केला जातो. अभ्यासादरमँन जर अस दिसल की क्रेडिट कार्ड चालणार नाही किंवा रेटसही आवाक्या बाहेर आहेत तर शाकाहारी हाँटेल मधुन मांसाहार नाहीये; किंवा उलट, या सबबीवर काढता पाय घेतला जातो. पण जर ती अडचण नसेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश करुन वेटरचा भेजाफ्राय करत करत भाताला व वरणाला अनुक्रमे राईस और डाल तर पोळी किंवा चपातीला रोटी संबोधुन एक दोन भाज्या अँड करत शेवटी स्वीटमे क्या है विचारत आँर्डर कंप्लीट होते. पदार्थ येईपर्यंत वेटरला किमान दोनदा तरी “जल्दी करो, कही जाना है ” अस घड्याळ बघत बघत सांगितल जात.

जेवणा दरमँन चमचा खाली पडणे, एखाद्याच्या मांडीवरचा रुमाल पडणे वा पाण्याचा ग्लास सांडणे या तिन पैकी किमान दोन गोष्टी होणे अनिवार्य असते. सर्वांचे जेवण व्हायच्या सुमारास चर्च्येअंती डिशमधे उरलेल अन्न संध्याकाळसाठी पँक करुन घ्यायच अस ठरत. परंतु भिडस्त स्वभावामुळे थोडीशी वातावरण निर्मिती केली जाते. वेटरला बोलाउन जणुकाही (Bowl) बोल हा बाउलचा अपभ्रंश असुन खरा उच्चार बाउल हाच आहे या अविर्भावात फिंगर बाउलची मागणी नोंदवली जाते. वेटर येताच “आपके कुक ओरीसाके है या गढवालके?” उत्तराची वाट न पहाताच ” खाना अच्छा था लेकीन बहुतही जादा था. अभि ये सभ कंटेनरमे पँक करके बिलके साथ दे दो” सांगितल जात.

बिल आल्यावर टिप् ठेवून किंवा क्रेडिट कार्डवर टिप् अँड करुन तो बिलाचा फोल्डर मिटून, प्रत्येकी मुठभर बडिशेप व बारीक खडीसाखर दडवुन बोटातल्या सुदर्शनचक्राला गाडीची किल्ली आहे असं दर्शवत हॉटेलच खरेदीखत आपल्या नावावर झाल्याच्या अविर्भावात टेबल सोडतात. घरी पोहोचल्यावरच लक्षात येत की बिल चेक करायच्या नादात पँकिंग हाँटेलमधेच विसरल!

— प्रकाश तांबे
860047888

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..