केला सुखाचा शोध धनसंपत्ती ठायीं
उशीरा झाला बोध ऐष आरामांत ते नाहीं
एका गोष्टीची उकलन कळली विचारापोटीं
आयुष्य हवे होते वाढवून देह सुखासाठीं
परि लागता ध्यान प्रभूचे चरणावरी
नको मजसी जीवन हीच भावना उरीं
सर्वस्व अर्पा प्रभुला हाच मार्ग सुखाचा
तेव्हांच मिळेल सर्वाला आनंद जीवनाचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply