थांबव गंगा यमुना मुली आपल्या नयनातल्या
हंसण्यात जन्म घातला मग ह्या कोठूनी आल्या ? //
हांसत गेले जीवन तुझे फूलपाखरा परी
तसेच जाईल भविष्यातें आशिर्वाद देतो शिरीं //
समजतील दुःखी तुजला नसता तो तुझा स्वभाव
हासून खेळून आनंदाने फूलवित रहा भाव //
जाणून घे स्वभाव सर्वांचे रमुन जा संसारी
चाली रितीचे पालन करावे तुझ्याच नव्या घरी //
आई बाबा दुरावले बाळगु नकोस खंत
पाहशील आम्हाला सासू सासऱ्याच्या रुपांत //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लेकीच्या सासरी पाठवणीची कविता खुपच ह्रृदयस्पर्शी आहे.