प्रभू दयेची बरसात,
चालू असते सतत,
ज्ञानाची गंगोत्री वाहते,
पिणाऱ्यालाच मिळते ।।१।।
प्रत्येक क्षण दयेचा,
टिपणारा ठरे नशीबाचा,
जलात राहूनी कोरडे,
म्हणावे त्यास काय वेडे ।।२।।
फळे पडतां रोज पाही,
त्याची कुणा उमज न येई,
परि न्यूटन एक निघाला,
बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।।३।।
चहा किटलीचे झाकण हाले,
स्टिफनसनने इंजीन शोधले,
जीवनातील साधे प्रसंग,
शास्त्रज्ञांची बनले अंग ।।४।।
प्रभू असतो सतत तयार,
ठरवा दया कशी घेणार,
प्रयत्न होता अंतःकरणी,
यश लाभेल घ्यावे समजोनी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply