जेवणानंतर ढेकर देणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. किंबहुना जेवणानंतर ढेकर दिल्यानंतर जेवणाऱ्याचे मन आणि भूक दोन्ही तृप्त झाले अशी मान्यता आपल्याकडे आहे. तर काही लोक ढेकर येण्याला अपचनाचे लक्षण समजतात. अश्या वेळी ढेकर येण्यामागे नक्की कोणते शास्त्रीय कारण आहे हे जाणून घेणे अगत्याचे आहे. जेवल्यानंतर ढेकर जेवल्यानंतर दोन-चार वेळा ढेकर येणं समान्य गोष्ट आहे. परंतु सतत बराच वेळ ढेकर येत असतील तर ही काळजी कारण्यासाखी बाब आहे. सतत ढेकर येणे हे आरोग्यस हानिकारक ठरू शकते.
आपण जेव्हा जेवत असतो, तेव्हा अन्नासोबत थोडी हवा देखील आपल्या पोटामध्ये जात असते. आपल्या शरीरातील अन्ननलिका आणि पोटाच्या मध्ये एक लहानशी झडप असते. ही झडप आपण अन्न ग्रहण करीत असताना उघडते. अन्न पोटामध्ये गेल्यानंतर ही झडप आपोआप बंद होते. अन्नासोबत थोडी हवा देखील त्या झडपेमध्ये शिरते. जेव्हा पोटामध्ये प्रमाणापेक्षा अधिक हवा शिरते, तेव्हा ती हवा शरीराबाहेर टाकली जावी असा निर्देश मेंदूद्वारे त्वरित पचनसंस्थेला दिला जातो. त्याचवेळेस पोटाच्या मासपेशी ताठरतात, आणि पोटावरील झडप काही काळाकरिता उघडली जाते. त्या झडपेमधून पोटामधील साठलेली हवा घश्याच्या मार्गे, तोंडावाटे बाहेर टाकली जाते. यालाच ढेकर असे म्हटले जाते.
सतत ढेकर का येतात ह्याची मूळ कारणे आता आपण पाहणार आहॊत.
१. अपचन
ऍसिडिटीसारखे पोटाचे विकार झाले असल्यासही सतत ढेकर येण्याची शक्यता आहे. अशा आजारांवेळी पोटात हवा साचून राहते आणि ती ढेकरच्या रुपात बाहेर पडते.
२. घाई-घाईने जेवणे.
काही लोक पटापट जेवतात किंवा मोठे मोठे घास घेतात. याचा थेट परिणाम त्यांच्या पचनक्रियेवर होत असतो. काही लोकांना तसेच गप्पा मारत सावकाश जेवण्याची सवय असते. तर अनेक जण जेवण उरकण्याचा मागे असतात. असे घाईने जेवल्याने आणि गप्पा मारत जेवल्याने हवा पोटात जाते आणि अन्नपचनात बाधा येऊन पचनमार्गात बाहेरून आत गेलेली हवा अडकून राहते. मग ढेकराच्या माध्यमातून ती हवा बाहेर पडते.
३. पोट खराब झाल्याने
पोट खराब झाल्याने पोटामध्ये गॅस तयार होतो. अन्न पचवण्यासाठी मदत करणारे पोटातील बॅक्टरियांचे संतुलन बिघडल्यामुळे पोटात गॅसची समस्या होते. पोटासंबंधित एखादा आजार झाल्यासही ढेकर येतात आणि हे आजार कालांतराने गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत ढेकर येत राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
४.जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक सेवनाने
विविध प्रकारच्या कोल्डड्रिंक्समुळे पोटामध्ये हवा साचून राहते आणि त्यातून पोटात गॅसचे बबल्स तयार होतात. मग हा गॅस तोंडावाटे ढेकराच्या रुपात बाहेर पडतो. मात्र, अनेकदा फुफ्फुसाच्या पडद्याला याचा त्रास होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून आपण शक्यतो कोल्ड ड्रिंक पिणे टाळावे.
५.डिप्रेशन
तणाव अनेक समस्यांचे कारण बनतो. तणाव किंवा एखाद्या मोठ्या भावनात्मक बदलाचा प्रभाव आपल्या पोटावर देखील पडतो. एका संशोधनानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या जवळपास ६५ टक्के लोकांच्या बाबतीत त्यांच्या मूड मध्ये त्वरित आणि मोठा बदलाव किंवा तणाव वाढल्यास ढेकर येण्याचे प्रमाण वाढू शकते.
— संकेत रमेश प्रसादे
Leave a Reply