करू नकोस विचार त्याचा, करणे नाही जेंव्हां तुजला
मोलाचे हे जीवन असता, व्यर्थ दवडशी वेळ कशाला….१
दोन घडीचे जीवन सारे, क्षणा क्षणाने जाईल निघूनी
कुणासाठी हा काळ थांबला, उत्तर याचे घे तू शोधूनी….२
लहरी उठतील विचारांच्या, आघात होता जेंव्हां मनी
विवेक बुद्धीने शांत करावी, भाव तरंगे त्याच क्षणी….३
मर्यादेचे आयुष्य असता, वाहू नकोस विचार प्रवाही
भगवंताचे स्मरण करण्या वेळेची परि बचत करावी….४
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply