जगती, नित्य सदविवेके
चालत रहा, चालत रहा
मुलमंत्र, हाच जीवनाचा
सत्कर्म, सदा करीत रहा।।
विधिलिखित सारे जीवन
प्राक्तनाच हा भोग आम्हा
सुखदु:खांच्या सावलीतूनी
स्वानंद,समाधान घेत रहा।।
जन्मी, भाळी जे जे लाभले
त्यात समाधान मानीत रहा
निराशावादी कधी राहु नये
मनी, आशावाद जपत रहा।।
सत्संगे, पापांचे होते क्षालन
उतम सहवासात, सदा रहा
जीवन, खेळ कठपुतळीचा
प्रभुरामाचे रामनाम घेत रहा।।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०९.
१० – ४ – २०२२
Leave a Reply