मला एकटे, जगण्याचा सराव नाही
जीवनाचा अर्थ अजुनी कळला नाही
सर्वांच्या, बोटास धरुनी मी चाललो
तोल सांभाळणे अजुनी जमले नाही
भोगले भाळीचे, सारेच दिव्य होते
ऋण! जन्मदात्यांचे विसरलो नाही
हात संस्कारांचे लाभले सदा तारणारे
त्या स्पर्शाला! कधीही भुललो नाही
श्रमलो भिजलो साऱ्या ऋतुचक्रातुनी
वेदनांची, कधीच फिकीर केली नाही
वर्दळ सुखदुःखांची अविश्रांत जीवनी
जगतांना, मी कधीच कुरकुरलो नाही
शिकवण! ठेविले अनंते तैसेची रहावे
उमजुनी सारे, जगण्यास टाळले नाही
फुलुनी, उमलावे, गंधुनीया दरवळावे
या सद्गुणां, अजूनही विसरलो नाही
भाग्यवन्त! मजसी लाभला सत्संग
त्या सत्संगा, कदापि मी भुललो नाही
— वि.ग.सातपुते ( भावकवी)
9766544908
१५ – १ – २०२२.
Leave a Reply