स्वातंत्त्र्यदिनानिमित्त
ढम ढमा ढम ढोल वाजवा ढोल
ढम ढमा गा सत्तरीचे बोल ।।
ढम ढमा सत्तरी हेंच अत्तर
हिनें मनांवर केला हल्लाबोल ।।
ढम ढमा ढम सत्तेचाळिसला
देशाला स्वातंत्र्य मिळे अनमोल ।।
ढम ढमा त्या स्वातंत्र्यासाठी
कितिकांनी प्राणांचें दिधलें मोल ।।
ढम ढमा ढम दशकांनी दो-तीन
आणिबाणिची अंधारी झांकोळ ।।
ढम ढमा ढम आदरणिय नेते
चरती, चरुनी बनती गोलमटोल ।।
ढम ढमा ढम सार्या जनतेचा
ऐकूं येतो कोणां ना कल्लोळ !
ढम ढम शंभरिही येईल, तरी
जनता नशिबा लावत राहिल बोल ।।
ढम ढमा अति सोशिक जरि जनता ,
किती भावनांचा राखिल समतोल ?
‘रामनाम सत’ देशाचें होतां
ढम ढम मनुजा, वाजवीत बस ढोल !
ढम ढम तरिही आशा नवी फुले
खचित जन नवे बदलतील माहौल ।
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Leave a Reply