कुठुनशी येते नित्य कविता
मलाच माझे कळतच नाही
झुळझुळते वास्तव शब्दांचे
कसे ते मजला कळत नाही
निर्बंधी मी क्षण टिपतो सारे
मनशब्दां बांध घालित नाही
सत्य दृष्टांता स्वछंदी गुंफितो
इमले कल्पनांचे रचित नाही
भावनांच्या त्या शब्दफुलांवर
मी अन्याय कधी करीत नाही
शब्दशब्द, दानच दयाघनाचे
मी अलगद वेचणे सोडित नाही
शब्दभावनांच्या अथांग सागरी
मी डूंबायाचे कधी सोडित नाही
मुक्त सचैल, सदैव नाहत रहतो
ते सुखस्वानंदी मी हरवित नाही
मीच वेडा, सर्वा वाचित जातो
त्यावीण, जगणे उमगत नाही
ठुमकत, ठुमकत येते कविता
मग हात तिचा मी सोडित नाही
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५५
११/१०/२०२२
Leave a Reply