सत्य, दृष्टांत हरिहराचा
शब्द निःशब्द भावनांचे
लोचनीच फक्त साठवावे
रूप, अतर्क्य नियंत्याचे…..
गवाक्षी कवडसे नारायणी
तिमिरीही भाव प्रसन्नतेचे
उघड़ता कवाड़े अंत:चक्षु
ओंजळी शब्द सरस्वतीचे
द्वैत अद्वैताचे मिलन सुंदर
तृप्ततादात्म्य मुग्ध पावरीचे
स्पंदनी झरावी पुण्यपुण्यदा
भाग्य, मंत्रमुग्धी कृतार्थतेचे….
मीत्व व्यर्थची सोडूनी द्यावे
अर्थ ! उमजावे सात्विकतेचे
निर्मोही मैत्रतत्व उरी रुजावे
स्मरावे नित्य नाम भगवंताचे….
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १९६
११/८/२०२२
Leave a Reply