हिशोब तुजला घ्यावयाचा, मानव दरबारी थोडा
दृष्य केले जे का येथे, मानव वाचील त्याचा पाढा…..१
अदृष्य सारे कोण जाणती तुजवीण, ना कोणी येथे
खरा हिशोब तोच कर्माचा, पाप असो वा पुण्य मग ते….२
नीती अनीतीच्या चाकोरीतून, जाई कुणीतरी असा एकटा
मानवनिर्मित असेल बघून, उचलील तो मग त्यातील वाटा….३
बाह्यांगाचे कर्म निराळे, शरिरमनाशी निगडीत ते
अंतकर्मे आत्म्याची जाणे, बंधन त्यावरी कुणाचे नसते….४
असेल जे का सत्य तेवढे, चिटकूनी राही आत्म्यासंगे
शरिर मनाच्या विळख्यामधूनी, सोडवूनी घेई आपली अंगे….५
क्षणात जाईल जळून सारे, देह मनाचे जे जे वेष्ठण
सोडून मागे केवळ राही, सत्य आधारीत असे ते जीवन….६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply