सरकारी आणि निम सरकारी कचेरी हि धार्मिक कामासाठी नाही . त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे धार्मिक कर्म कांड करू नये असा फतवा काढला आहे.
अपेक्षे प्रमाणे त्यावर तथाकथित धर्म रक्षकांचा हल्ला बोल होणारच आहे.पण सरकारचे या बाबतीत विशेष अभिनंदन करायला हवे . कुठेतरी या सरकारने विवेकाची कास धरायला सुरवात केल्याचे हे निदर्शक आहे.धर्माच्या नावावर गल्लाभरू थोथांड आता सर्रास सुरु आहे.
अत्यंत दाट झोपडपट्ट्या पासून ते एअर पोर्ट मधल्या कार्यालयातून हल्ली कसले कसले उत्सव , जयंत्या ,सत्यनारायणाच्या पूजा केल्या जातात.दुष्काळात तेरावा महिना असावा तसे काम न करणारे या काळात अधिकृत पणे मजा मारत फिरतात . वरिष्ठ या सर्व गोष्टी थांबवू शकत नाहीत.कामाचा खोळंबा होतो. भाजपा सरकार ने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.हिदुत्व वादी सरकार असूनही अनुचित प्रथा परंपरा यावर अंकुश ठेवण्यासाठी जो डोळस पण लागतो तो या सरकार कडे आहे याचे हा निर्णय म्हणजे एक पुरावाच आहे..धर्माच्या नावावर लूट करणारे पुष्कळ आहेत . या लोकांना धर्म नव्याने समजून सांगण्याची गरज आहे .
हजारो वर्षे यवनांची या देशावर राज्य केले.दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले तरीही हिंदू धर्म शाबूत राहिला . या धर्माला कामचोर लोकांची कवच कुंडले नकोत.नारायण नागबली विधी करायला लावून गब्बर झालेल्या त्रंबकेश्वरच्या ३/४ पुरोहितांवर प्राप्तिकर खात्यांनी धाड टाकून कोट्यवधींची संपत्ती जप्त केली. हि संपत्ती धर्माचे अवडंबर माजवून जमवलेली होती.
हे काम सुद्धा भाजपा सरकारनेच केले आहे. या सरकार मध्ये सुद्धा काही कट्टर पंथीय आहेत. पण त्यांचा विरोध जुगारून जर हि कामे होत असतील तर मी या सरकारचे मना पासून अभिनंदन करतोय. अजूनही लोकांना धर्माची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे. भाजपा सरकारने ती करावी हीच अपेक्षा आहे.
चिंतामणी कारखानीस
25 January 2017
Leave a Reply