सावधान कोण करितो
जो घडवितो, जो जगवितो
तोचि संदेश धाडीतो..
जगण्यासाठी!!
अर्थ–
बोहल्यावर चढलेल्या नारायणास मंगलाष्टकांच्या समयी प्रश्न पडला, “अरे… सारे काही शुभ आहे, मंगल आहे मग सावधान का राहायचे?” आणि त्यात नारायणास साक्षात्कार झाला की जर मला काही मोठे देशकार्य करायचे असेल तर या शुभमंगल समयी मला नुसते सावधान नाही तर अतिशय दक्ष राहावे लागेल. अन्यथा एकदा का मी या अग्नीच्या साक्षीने विवाह केला तर ते कार्य मला अर्धवट सोडता येणार नाही आणि मग 2 दगडांवर पाय ठेवूनि तोल सांभाळणे कठीण होऊन बसेल.
म्हटल्या जाणाऱ्या किंवा कानावर पडणाऱ्या शब्दांचं मर्म समजणं किती आवश्यक आहे याची प्रचिती आपल्या सर्वांना नेहमीच येत असते.
काय करायचे आहे हे पक्के झाल्याशिवाय काय करायचे नाही हे कळत नाही. म्हणून आयुष्यात काय करायचे हे ठरवणे महत्वाचे. काय करायचे ठरले की त्याविषयी जिद्द, महत्वाकांक्षा, विश्वास आपोआप निर्माण होतो. पण जर काय करायचे हेच ठरवले नाही तर सगळेच करायचे यावर समय निघून जातो अन हाती काहीच लागत नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply