नवीन लेखन...

आसाम प्रश्न व पाकिस्तान – सावरकरांच्या नजरेतून

Sawarkar, Assam issue and Pakistan

स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाच्या सर्व प्रांतात हिंदूंची कशी स्थिती आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, याचा सतत विचार करीत असत. त्यांनी १३ जुलै १९२१ रोजी पत्रक काढून आसामच्या हिंदूना सावध केले होते की मुसलमान व ख्रिश्चन यांच्यापासून सावध रहा. त्या पत्रकात ते म्हणतात, `आसामी हिंदुवरील भावी संकट आसाम मुसलमान बनविण्याचा डाव हिंदुस्थानातील सर्व हिंदु समाज व विशेषतः आसाम मधील हिंदु जनता यांचे एक भयानक आरिष्टाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आसाम प्रांताला मुसलमान बहुसंख्याक प्रांत बनवून तेथील हिंदूंचे जिणे अशक्य करुन सोडण्याची कारवाई चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून बंगाल नि इतर प्रांत यामधील मुसलमान आसामात आणून त्यांची वस्ती करुन आसामातील मुसलमानांची संख्या वाढविण्याचा पध्दतशीर प्रयत्न चालू असून त्याला बरेच यशही आले आहे.’

पण सावरकरांचे हे म्हणणे काँग्रेस सरकारने ऐकले नाही. उलट आसाममध्ये संमिश्र मंत्रीमंडळ स्थापून मुस्लीम लीगचा कडवा, देशद्रोही मुसलमान मुख्यमंत्री केला. त्यामुळे मुसलमानांना असाममध्ये घुसणे, आणखी सोपे झाले. आसाममध्ये मुस्लीमराज्य आणण्याचे लीगचे स्वप्न या मंत्रीमंडळाने प्रत्यक्षात आणले. १९४१ सावरकरांनी व आसाम हिंदुमहासभेने कडवा विरोध केला म्हणून फाळणी झाल्यावर आसाम पाकिस्तानात गेला नाही. १९४२ मध्ये सावरकरांनी आसामचा दौरा करुन मोठी जागृती निर्माण केली. साडेचार हजार मैलाचा प्रवास केला. शंभर भाषणे दिली. अनेक आसामी नेते व वन्य जमातीचे नेते यांच्याशी चर्चा केली. आसामला जाण्यापूर्वी त्यांनी आसामचा इतिहास अहोम राजाचा पराक्रम, तेथील सामाजिक परिस्थिती इत्यादींचा अभ्यास केला होता. आसामातील सादुल्ला मंत्रिमंडळ पदच्युत करण्यात सावरकरांचा सहभाग होता. सावरकरांनी वेळोवेळी धोक्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यांनी इशारा दिला.

आसाम मुस्लीम बहुसंख्य प्रांत झाला तर पूर्वेकडून धोका

सिंधपासून काश्मीर पर्यंत हिंदुस्थानच्या पश्चिम व वायव्य प्रांतात मुस्लीम बहुसंख्या झाली आहे. त्याचे पाकिस्तान होईल. पश्चिम सीमेप्रमाणे पूर्व बंगाल व आसाम हेहि पश्चिम सीमेवरील प्रांत मुस्लीम बहुसंख्य होऊ दिले तर हिंदु जगताच्या सुरक्षिततेला व स्वातंत्र्याला, एकसंधतेला कायमचा धोका होईल. व पाकिस्तानी शक्तीकडून मातृभूमीच्या पूर्व व पश्चिम सीमा वेढल्या जातील.(१९४१, व्हर्लवाईड प्रोपायंडा पान ४४५) सावरकरांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्व बंगाल पाकिस्तानात गेला आता आसाम मुस्लीम बहुसंख्यांक प्रांत करुन बांगला देश या मुस्लीम राष्ट्राला जोडण्याचे कारस्थान चालू आहे. सध्या आसामात मुसलमानांच्या ज्या दंगली व हिंदुवर हल्ले चालू आहेत, त्याचे प्रयोजन आसाम बांगला देशाला जोडणे हे आहे. बांगलादेशात मुस्लीम लोकसंख्येचा स्फोट झाला आहे. त्यातील मुस्लीम लोकसंख्या पश्चिम बंगाल व आसाम येथे हिंदूवर आक्रमण करुन त्यांना प्रांताच्या बाहेर हाकलून देण्याचे कारस्थान चालू आहे. हे आमच्या मुस्लीमधार्जिण्या, ढोंगी, निधर्मी राज्यकर्त्यांनी ओळखले नाही तर आसाम हातचा जाईल. यांची पूर्व कल्पना स्वातंत्र्यवीर सावरकरासारख्या द्रट्या पुरुषाने साठ वर्षापूर्वी दिली होती. पण आमच्या सावरकर द्वेष्टा राज्यकर्त्यांनी ते ऐकले नाही. सावरकरासारख्या थोर राष्ट्रभक्ताला जातियवादी ठरविले. त्याचे परिणाम आजही दिसत आहेत. सावरकर निक्षून सांगत होते.

आसामातील मुसलमान आक्रमकांची हकालपट्टी करा

”ज्या जुन्या वा नव्या मुसलमान आक्रमकांनी (घुसखोरांनी ) आसामात घुसखोरी केली आहे, त्या सर्वांची अगदी शेवटच्या माणसापर्यंत हकालपट्टी केली पाहिजे. त्यांना एक तसुभरही भूमी देवू नये. भुतकाळात आपण त्यांना तसू तसू भूमी दिली, त्याचे कडु फळ म्हणून आज सर्व हिंदुस्थान पादाक्रांत करण्याची त्यांनी आसुरी लालसा धरली आहे. आसामात घुसलेल्या औरंगजेबी सैन्यास खडे चारणार्‍या शूर आसामी वीरांच्या आजच्या वंशजांनी या बाजारबुळग्यांना कधीही शरण जावू नये. अखंड हिंदुस्थानची पूर्वसीमा सरक्षिण्याचे पूर्वपरंपरागत कर्तव्य चोखपणे पार पाडण्याचे पवित्र कर्तव्य आसामी हिंदूनी पार पाडलेच पाहिजे.”(१९४७) आसामचे पाकिस्तान होऊ नये म्हणुन त्यावेळी सावरकरांनी जो मार्ग सुचविला, तो आजहि उपयुक्त आहे.

(आसामच्या हिंदूंनी मुसलमान धार्जिणे सरकार उलथून टाकले पाहिजे.काँग्रेसच्या ढोंगी निधर्मी वादापासून मुक्त झाले पाहिजे. काँग्रेस सरकार हिंदूचे रक्षण करण्यात निरुपयोगी ठरले आहे. मुसलमानमय झालेल्या आसामचा भस्मासुर काँग्रेसच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करेल, हे लक्षात ठेवले पाहिजे आसाम मधील हिंदु अल्पसंख्य होतील, यातून मुक्त होण्यासाठी काँग्रेसच्या निधर्मीवादाच्या शापातून हिंदूनी आपली मुक्तता करुन घेतली पाहिजे.)

आसामच्या हिंदूंनी मुसलमान धार्जिणे सरकार उलथून टाकले पाहिजे. काँग्रेसच्या ढोंगी निधर्मी वादापासून मुक्त झाले पाहिजे. काँग्रेस सरकार हिंदूचे रक्षण करण्यात निरुपयोगी ठरले आहे. मुसलमानमय झालेल्या आसामचा भस्मासुर काँग्रेसच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करेल, हे लक्षात ठेवले पाहिजे आसाम मधील हिंदु अल्पसंख्य होतील, यातून मुक्त होण्यासाठी काँग्रेसच्या निधर्मीवादाच्या शापातून हिंदूनी आपली मुक्तता करुन घेतली पाहिजे.

सावरकर पुढे म्हणतात, “या सार्‍या दुर्घटनावरुन एवढा तरी धडा घ्यावा की रडून कुथून काही कधी कोठे संकट निवारण होत नसते. आगामी आपत्तीशी यशस्वी रितीने टक्कर घ्यावयाची असेल तर एकच मार्ग प्रतिपक्षाला कारस्थानी तसेच प्रभावी कारस्थान उभे करणे, तशीच आपली समर्थ संघटना आगामी हिंदूंनी घडविली पाहिजे. शत्रूच्या शस्त्रांनीच लढून विजय संपादण्याची शक्ती उत्पन्न केली पाहिजे.”

“धटासि पाहिजे धट।
उध्दटासि पाहिजे उध्दट।
खटनटासी खटनट।
अगत्य।।”

लक्षांत ठेवा, याविना तरणोपाय नाही.

सावरकरांनी दिलेली धोक्याची सूचना जर हिंदूनी पाळली असती तर स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षांनी सुध्दा या देशात मुसलमानांचे जे लाड चालले आहेत ते चालले नसते.

आज ४० जिल्हे मुस्लीम बहुसंख्य आहेत. आसाममध्ये जे घडले त्याबाबतीत मुंबईच्या मुसलमानांनी दंगल करावी, हे अनाकलनीय आहे. मुंबईत शिवसेना आहे, म्हणून मुंबई सुरक्षित आहे. नाहीतर या पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी मुंबई केव्हाच जाळली असती.

दंगली कोठे होतात? जिथे मुस्लीम लोकांची संख्या जास्त आहे. मुंबईच्या दंगलीत महिला पोलिसांचा विनयभंग व्हावा. पोलिसांवर हल्ला व्हावा, त्यांची बंदूक पळवून न्यावी. अमर ज्योतीची मोडतोड व्हावी. हे पोलिस खात्याला लाच्छनास्पद आहे.

मुजोर देशद्रोही मुसलमान व नेभळट सरकार यांच्या कात्रीत सापडलेल्या जनतेचे काय होणार?

— वा. ना. उत्पात, पंढरपूर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..